Thane News: यंदा समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील शेतकऱ्यांसाठी उन्हाळी शेतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही वर्षापासून पाण्याच्या टंचाईमुळे अडचणीत सापडलेली उन्हाळी शेती यंदा मात्र नव्या आशेने बहरताना दिसत आहे. पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा चांगले राहिल्याने विहिरी, तलाव आणि पाणीसाठ्यांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला असून त्याचा थेट फायदा शेतीला होत आहे. .वसई पूर्वेतील सातीवली, गोखिवरे, वालीव, फादरवाडी, चिंचपाडा, पेल्हार आदी ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उन्हाळी पिकांची लागवड सुरू केली आहे. भाजीपाला पिके भेंडी, दोडका, कारले, वांगी, मिरची, काकडी आणि टरबूज, खरबूज यांसारख्या फळपिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. पाण्याची उपलब्धता असल्याने पिकांची वाढही चांगली होत असून उत्पादनात वाढ होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत..Summer Farming Tips: वाढत्या तापमानात फळझाडे, भाजीपाल्यांचे संरक्षण.गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे जमिनीत आवश्यक ओलावा टिकून राहिला आहे. त्यामुळे सिंचनासाठी होणारा खर्चही काही प्रमाणात कमी झाला असून शेतकऱ्यांचा आर्थिक भार हलका झाला आहे..Summer Groundnut Farming: उन्हाळी भुईमूग पिकातील कीड व्यवस्थापन: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन.विशेषतः लहान व मध्यम शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे. वेळेवर पिकांना पाणी मिळत असल्याने पीक रोगराईपासून वाचण्यास मदत होत असून उत्पादनची गुणवत्ता सुधारत आहे..दरम्यान, बाजारपेठेत उन्हाळी भाजीपाल्याला चांगली मागणी असल्याने शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्याची अपेक्षा आहे. यंदाचा हंगाम चांगला जावा उत्पादन खर्च निघून नफा मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहे. उन्हाळी शेतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.