Parbhani News : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) परभणी जिल्ह्यासाठी २०२४-२५ या वर्षासाठीची संभाव्य वार्षिक पतपुरवठा योजना २५ जून रोजी जाहीर केली आहे. त्यानुसार यंदा जिल्ह्यातील बँकांना खरीप व रब्बी हंगामात मिळून २ हजार २५३ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गतवर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत यंदा पीककर्जाच्या उद्दिष्टात १२४ कोटी रुपये वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक उदय कुलकर्णी यांनी दिली.
जिल्ह्याची वार्षिक पतपुरवठा योजना जिल्हास्तरीय पतपुरवठा बैठकीत जिल्ह्याधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत २.५ टक्के वाढ करुन यंदाची जिल्हा वार्षिक पतपुरवठा योजना ६ हजार ३९६ कोटी रुपयांची करण्यात आली आहे. त्यात कृषी व संलग्न, बिगरशेती क्षेत्र, गृहनिर्माण कर्ज, शैक्षणिक कर्ज तसेच इतर कर्जाचा समावेश आहे.
यंदा पीकर्जाचे उद्दिष्ट २ हजार २५३ कोटी रुपये आहे. त्यात खरीप हंगामासाठी १ हजार ४७० कोटी ९७ रुपये व रब्बी हंगामासाठी ७८२ कोटी ३ लाख रुपये उद्दिष्टांचा समावेश आहे. कृषी व संलग्न त्यात फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय आदींसाठी १ हजार ५२७ कोटी रुपये मिळून एकूण शेती कर्जाचे ३ हजार ७८० कोटी रुपये उद्दिष्ट आहे. मध्यम, लघू, सूक्ष्म उद्योग व इतर प्राधान्य कर्जाचे १ हजार २५३ कोटी रुपये मिळून एकूण प्राधान्य क्षेत्रासाठी ५ हजार ३३ कोटी रुपये उद्दिष्ट आहे. बिगर प्राधान्य क्षेत्रासाठी १ हजार ६३ कोटी रुपये उद्दिष्ट आहे.
पीककर्जाचे नूतनीकरण १५ जुलैपूर्वी करा
कर्ज खाते थकबाकीमध्ये गेल्यास क्रेडिट रिपोर्ट खराब होऊन भविष्यात दीर्घ मुदत कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज, बचत गटासाठी कर्ज, इतर कुठलेही कर्ज उपलब्ध होणार नाही. त्यामुळे सहज, सुलभ, कमी व्याजदराने मिळणाऱ्या कर्जापासून शेतकरी वंचित राहू शकतात. पीककर्जाचे नूतनीकरण वेळेवर केल्यास शून्य टक्का व्याजाने हे पीक कर्ज उपलब्ध होईल.
अन्यथा, आपणास जास्त व्याज दर भरावा लागेल. सर्व बँकांनी त्यांचे कॅलेंडर तयार केले असून, बँकेच्या शाखेतील कर्मचारी गावी येणार आहेत त्या दिवशी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये येऊन अर्ज करून सोमवारपूर्वी (ता. १५)पूर्वी नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.