Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : लक्षांकापेक्षा १२३ टक्के अधिक कर्जवाटप

Agriculture Credit : दरम्यान, आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वात शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वाने लवकरच सुरू करणार असल्याचे संकेत श्री. कदमबांडे यांनी सभेत दिले.

Team Agrowon

Dhule News : धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदा ३४ हजार ३७० शेतकरी सभासदांना ३४८ कोटी ६१ लाखांचे कर्जवाटप करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला.

लक्षांकापेक्षा १२३ टक्के जास्तीचे कर्जवाटप केल्याचे सांगत बँक ग्राहकांसाठी लवकरच क्यूआर कोडची सुविधा सुरु करणार असून बँक मध्यम मुदत शेती कर्जवाटपाच्या प्रमाणात वाढ करणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी दिली.

दरम्यान, आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वात शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वाने लवकरच सुरू करणार असल्याचे संकेत श्री. कदमबांडे यांनी सभेत दिले. धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (ता. ३०) शहरातील अग्रवाल विश्राम भवनात झाली.

अध्यक्ष कमदबांडे, जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, संचालक प्रभाकर चव्हाण, राजेंद्र देसले, प्रा. शरद पाटील, दर्यावगीर महंत, श्यामकांत सनेर, भगवान पाटील, भरत माळी, संजय पाटील, हारसिंग पावरा, शीला पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सभेत अध्यक्ष श्री. कदमबांडे यांनी बँकेचा लेखाजोखा मांडला.

तसेच चालू वर्षी पीककर्जाची वसुली स्वेच्छेने परतफेड केल्यामुळे मार्चअखेर ९६ टक्के कर्जवसुली केल्याने सर्व शेतकरी सभासदांचे व शंभर टक्के पीककर्ज वसुली देणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे आभार मानले.

शिरपूर शेतकरी साखर कारखाना लवकरच सुरू होणार

आमदार पटेल यांचे नियोजन तसेच नेतृत्वात शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना व जिल्हा बँकेच्या संयुक्त समितीने कारखाना भाडेतत्त्वाने देण्याचे निश्चित केले आहे. भाडेकरारनाम्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

त्यामुळे आपला हक्काचा कारखाना लवकरच सुरू होईल. त्यातून शेतकरीहित साधले जाईल. शिसाका संचालक मंडळ व बँक संचालक मंडळ याकामी प्रयत्नशील आहे. हे काम प्राधान्याने केले जात आहे, असे बँकेने सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT