Crop Loan : पीककर्ज वाटपात बँकांची नकारघंटा

Kharif Crop Loan : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३-२४ साठी १८१२ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने बँकांना दिले आहे.
crop loan
crop loanAgrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३-२४ साठी १८१२ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने बँकांना दिले आहे. असे असताना जिल्ह्यात सर्वाधीक शाखा असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांनी आजपर्यंत केवळ ३१ टक्केच पीककर्ज वाटप केले आहे.

यातही प्रायव्हेट सेक्टर बँकांचे वाटप १२ टक्के आहे. जिल्हा बँकेने मात्र १११ टक्के पीककर्ज वाटप करुन आघाडी घेतली आहे. तर ग्रामीण बँकने ८० टक्के पीककर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेकडून मिळाली.

जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आगामी खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी १८१२.१४ कोटी तर रब्बीसाठी ६३७.८६ कोटी असे एकूण दोन हजार ४५० कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट २८ बँकांच्या वेगवेगळ्या शाखांना दिले आहे. या बाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याचे निर्देश दिले आहेत.

crop loan
Crop Loan : ग्रामीण बँक, जिल्हा बँकेची पीककर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती

पीककर्ज वेळेवर उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके यांनी सर्वच बँकर्सना वेळोवेळी सूचना दिल्या. परंतु राष्ट्रीयीकृत बँका तसेच खासगी क्षेतातील बँकांनीअद्याप पीककर्ज वाटपाला गती दिली नाही. राष्ट्रीयीकृत बँकांनी ता. २१ ऑगस्टपर्यंत ३१ टक्क्यानुसार जिल्ह्यात ५१ हजार २७२ खातेदारांना ४६८ कोटी ६९ लाखांचे कर्ज वाटप केले आहे.

crop loan
Crop Loan : धुळे जिल्ह्यात २० टक्केच पीककर्ज वितरित

खासगी क्षेत्रातील बँकांनी १२ टक्क्यांनुसार ८३० खातेदारांना सात कोटी ६२ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ५८ हजार ५०४ खातेदारांना ४५४ कोटी ३४ लाखांचे कर्ज वाटप केले आहे.

तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ४९ हजार ०१३ खातेदारांना ४११ कोटी ६३ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात ५४.४८ टक्क्यांनुसार आजपर्यंत खरिपासाठी एकूण एक लाख ५८ हजार ७८९ खातेदार शेतकऱ्यांना १३३४ कोटी ६५ लाख रुपयांचे कर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेकडून मिळाली.

व्यापारी बँकांकडून वाटप कमीच

जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज उपलब्ध व्हावे या करिता सर्वच बँकांना लक्षांक दिले आहे. परंतु व्यापारी बँका मात्र पीक कर्ज वाटपाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात असलेल्या १९ व्यापारी बँकांपैकी बऱ्याच बँकांच्या शाखांनी पीक कर्ज वाटप कमी केले आहे.

यात ऍक्सीस बँक, इंडूसंड बँक, कर्नाटका बँक, करुर वेश्य बँक, आयडीआय बँक, पंजाब अँड सिंध बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, बँकऑफ बडोदा, आयसीआयसी बँक व एचडीएफसी बँकांच्या शाखांतही वाटपाचे प्रमाण तुरळक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com