Jalgaon APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon APMC : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील १२ दुकानांना लावले सील

Municipal Corporation Action : कर न भरल्याने जळगाव महापालिकेने कृषी उत्पन्न बाजार समितीतील १२ दुकानांना महापालिकेने सील लावले.

Team Agrowon

Jalgaon News : कर न भरल्याने महापालिकेने कृषी उत्पन्न बाजार समितीतील १२ दुकानांना महापालिकेने सील लावले. प्रभाग समिती क्रमांक तीन अंतर्गत येणाऱ्या मार्केट यार्ड भागातील एकूण ६४ दुकानांची मालमत्ता कराची २८ लाख रुपये थकबाकी होती.

प्रशासनाकडून संबंधितांना यापूर्वीच अधिपत्र बजावले. परंतु संबंधितांनी थकबाकी भरलीच नाही, त्यामुळे महापालिकेने आज कारवाई करण्याचे आदेश देत, दुकाने सीलबंद करण्यासाठी एस. एस. पाटील व प्रकाश सोनवणे यांच्या अधिपत्याखाली दोन पथकांची नियुक्ती केली.

दोन्ही पथकांत प्रत्येकी दहा कर्मचारी नेमून ही मोहीम राबविताना दिवसभर १२ दुकाने सील केली. कारवाई टाळण्यासाठी २४ दुकानदारांनी ९ लाखांचा भरणा केला. तर थकबाकी न भरणाऱ्यावर कार्यवाही सुरूच राहणार आहे.

ज्या मिळकतधारकांनी, मालमत्ता थकबाकीधारकांनी अभय शास्ती माफी योजनेचा लाभ घेतल्यानंतरही थकबाकी भरलेली नाही अशावर प्रशासन यापुढे मालमत्ता जप्ती कार्यवाहीत सातत्य ठेवणार आहे.

त्यामुळे थकबाकी भरणा केलेला नसलेल्या मिळकतधारकांनी त्वरित थकबाकी भरून जप्तीची कार्यवाही टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड व उपायुक्त निर्मला गायकवाड व सह आयुक्त गणेश चाटे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Swabhimani Motorcycle Rally: ऊसदरासाठी ‘स्वाभिमानी’चे शक्तिप्रदर्शन; मोटारसायकल रॅलीमध्ये हजारो शेतकऱ्यांचा सहभाग

Agriculture Drought Management: दुष्काळात पाणी बचतीसह रब्बीचे नियोजन; कृषी विभागाकडून ७ हजार हेक्टरवर चारा उत्पादनाचा प्रस्ताव

Purandar Drought Condition: पुरंदर तालुक्यात दुष्काळाचे संकट; २३ हजार ६८४ हेक्टर क्षेत्र बाधित

Kharif Crop Damage: मावळमध्ये खरीप पिकांचे मोठे नुकसान; भात, सोयाबीन, भुईमुगाला ७० ते ८० टक्के फटका

Agricultural Infrastructure: शेतीमाल मूल्यवर्धनासाठी अत्याधुनिक सुविधांवर भर; नवीन गोदामे, शीतगृहे आणि विकिरण केंद्रे उभारणार: पणनमंत्री जयकुमार रावल

SCROLL FOR NEXT