Shetkari Sahitya Samelan  
ॲग्रो विशेष

Shetkari Sahitya Samelan : नाशिकमध्ये होणार ११ वे शेतकरी साहित्य संमेलन

Farmers Literature Conference : भानू काळे संमेलनाध्यक्ष, नाना पाटेकर उद्घाटक, शिंदे स्वागताध्यक्ष

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Nashik News : नाशिक : ‘‘लेखणीद्वारे शेतीची दुर्दशा थांबवून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतक्या शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण व्हावी,

या उद्देशाने ४ व ५ मार्च रोजी नाशिक येथे दोन दिवसीय ११ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी दिली.

शेती व्यवसायाला भेडसावणाऱ्या दाहक वास्तवाची जाणीव मराठी साहित्य विश्‍वाला होण्यासाठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. गेल्या १० वर्षांपासून या उपक्रमात सातत्य राखले आहे.

शेती उद्योगक्षेत्रात भरीव कामगिरी करून शेतीउद्योगाला नवी दिशा देणाऱ्या मोहाडी (जि. नाशिक) येथील सह्याद्री फार्म्स परिसरात हे संमेलन होईल. संमेलनाध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे भूषवतील. तर नाम फाउंडेशनचे संस्थापक व ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर संमेलनाचे उद्घाटन करतील.

या वेळी ज्येष्ठ शेतकरी नेत्या सरोज काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेते अ‍ॅड. वामनराव चटप हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे स्वागताध्यक्ष, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, संयोजक मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतीश बोरुळकर हे असतील. यांची निवड करण्यात आली आहे. आयोजन समितीमध्ये प्रमोद राजेभोसले, ज्ञानेश उगले, शंकरराव ढिकले, सोपान संधान, निवृत्ती कडलग, प्रा. डॉ. कुशल मुडे, दिलीप भोयर, रवींद्र दळवी, सारंग दरणे, गणेश मुटे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

संमेलनाचे स्वरूप कौशल्यगुणांचे, प्रतिभेचे प्रदर्शन मांडून साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबिर ठरावे आणि सशक्त लेखणीद्वारे इंडियाच्या बरोबरीने भारतालाही समृद्ध करण्यासाठी हातात लेखणी घेऊन लढणाऱ्या सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे, असे मुटे यांनी कळविले.

.

..अशी असेल साहित्य मेजवानी
या संमेलनात उद्घाटन सत्र, शेतकरी कवी संमेलन, शेतकरी गझल मुशायरा, परिसंवाद, कथाकथन असे विविधांगी सत्रे असतील. ज्येष्ठ साहित्यिक, राजकीय नेते, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्र अभ्यासक, अर्थतज्ज्ञ आदी अनुभवी वक्ते मार्गदर्शन करतील.

तरी सर्व शेतीप्रेमी साहित्यिक आणि रसिकांनी नोंदणी करून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT