Shetkari Sahitya Sammelan : शेतकरी साहित्य संमेलनाचे गुरुकुंज मोझरीत आयोजन

दहाव्या अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन गुरुकुंज मोझरी (ता. तिवसा) येथे शनिवार (ता. २१) पासून करण्यात आले असून ते दोन दिवस चालेल.
Shetkari Sahitya Sammelan
Shetkari Sahitya SammelanAgrowon
Published on
Updated on

अमरावती ः दहाव्या अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे (Shetkari Sahitya Sammelan) आयोजन गुरुकुंज मोझरी (ता. तिवसा) येथे शनिवार (ता. २१) पासून करण्यात आले असून ते दोन दिवस चालेल.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. किशोर सानप (Dr. Kishor Sanap) तर उद्‌घाटक म्हणून सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे (Vilas Shinde) राहतील, अशी माहिती अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी दिली.

Shetkari Sahitya Sammelan
Agrowon Agri Exhibition : ‘अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी

शेती व्यवसायाला भेडसावणाऱ्या दाह वास्तवाची जाणीव मराठी साहित्य विश्‍वाला होण्याच्या उद्देशाने शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. गेल्या नऊ वर्षांपासून या उपक्रमात सातत्य राखण्यात आले असून यंदाचे संमेलन दहावे असणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे शेती साहित्य क्षेत्रातील क्रियाशील सृजन लक्षात घेऊन त्यांच्याप्रती आदरभाव व कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी हे संमेलन गुरुकुंज सेवाश्रमाच्या पावनभूमीत होणार आहे.

Shetkari Sahitya Sammelan
Grape Rate : कडवंचीच्या काळ्या द्राक्षाला प्रति किलो १२१ रुपयांचा दर

संत वाङ्‌मयाचे गाढे अभ्यासक डॉ. किशोर सानप हे संमेलन अध्यक्षपदी राहतील. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रमाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शेती उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करुन शेती उद्योगाला नवी दिशा देणारे ‘सह्याद्री फार्म’चे अध्यक्ष विलास शिंदे संमेलनाचे उद्‌घाटन करतील.

विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे तसेच वऱ्हाडी कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांची या वेळी विशेष उपस्थिती राहील. संमेलनाच्या आयोजनाकरीता साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे, संयोजक दिलीप भोयर यांनी कार्यभार स्वीकारला असून विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

समित्यांमध्ये दिलीप भोयर, माधव गावंडे, जगदीशनाना बोंडे, विजय विल्हेकर, श्रीकांत पाटील पुजदेकर, सुधाकर थेटे, संदीप अवघड, दत्ता राऊत, सारंग दरणे, गणेश मुटे, मुकेश धाडवे, भाऊराव उमाटे यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com