Panchayat Raj Agrowon
ॲग्रो विशेष

Panchayat Raj Day : वडाचीवाडी, पुरंदावडे, खडकीसह जिल्ह्यातील ११ गावे ठरली ‘सुंदर’

राष्ट्रीय पंचायतराज दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील आर. आर. (आबा) पाटील जिल्हा व तालुका सुंदर गावांची घोषणा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

Team Agrowon

Solapur News : राष्ट्रीय पंचायतराज दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील आर. आर. (आबा) पाटील जिल्हा व तालुका सुंदर गावांची घोषणा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

पालकमंत्री विखे-पाटील यादिवशी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. नियोजन भवनातील बैठकीत त्यांनी या गावांची घोषणा केली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक यांचे अभिनंदन करून अधिक चांगल्या कामांसाठी शुभेच्छा दिल्या. याचे बक्षीस वितरण स्वतंत्र कार्यक्रमाद्वारे करण्यात येणार आहे.

या ११ गावांची पुरस्कासाठी निवड

जिल्हा सुंदर गावासाठी रक्कम ४० लाखाचे बक्षीस आहे. तर तालुका सुंदर गावासाठी दहा लाखाचे बक्षीस आहे. अकरा तालुक्यातील अकरा गावांना पुरस्कार मिळालेल्या सुंदर ग्रामपंचायतीमध्ये वागदरी (ता. अक्कलकोट), अंबाबाईची वाडी (ता. बार्शी), खडकी (ता. करमाळा), वडाचीवाडी (ता. माढा), पुरंदावडे (ता. माळशिरस), लमाणतांडा (बालाजी नगर) (ता. मंगळवेढा), आष्टी (ता. मोहोळ), कौठाळी (ता. उत्तर सोलापूर), तिसंगी (ता. पंढरपूर), वाकीशिवणे (ता. सांगोला), दिंडूर (ता. दक्षिण सोलापूर) या गावांचा समावेश आहे.

राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी चार गावांना नामांकन

दरम्यान, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी राज्यातून जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींना नामांकन देण्यात आले आहे. यामध्ये सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव म्हणून अंकलगे (ता. अक्कलकोट), बालस्नेही गाव म्हणून अर्धनारी (ता. मोहोळ), सुशासनयुक्त गाव म्हणून भोसे (ता. पंढरपूर) आणि स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा असलेले गाव म्हणून यशवंतनगर (ता. माळशिरस) या गावांना नामांकन देण्यात आल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी या वेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID: फार्मर आयडीच्या गोंधळाचा शेतकऱ्यांना फटका

Adulteration Issue: दूध, अन्नभेसळ टाळण्यासाठी देशी गोपालन कार्यक्रमांची गरज

Agri Diploma Jobs: कृषी पदविकाधारकांना नोकर भरतीत न्याय देणार; कृषिमंत्री कोकाटे

Banana Harvest: खानदेशात आगाप कांदेबाग केळीच्या काढणीला सुरुवात

India China Relation: भारत-चीनमध्ये हवा खुला संवाद : एस. जयशंकर

SCROLL FOR NEXT