Gujarat Records Rabi Sowing As Farmers Expand Wheat, Gram and Maize Area: गुजरातमध्ये रब्बी हंगामातील पीक क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षी इतर पिकांच्या तुलनेत बऱ्यापैकी भाव मिळाल्याने यंदा गहू, हरभरा आणि मका यासारख्या प्रमुख पिकांनी अधिक क्षेत्र व्यापले असल्याचे सांगितले जात आहे. .रब्बीतील पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. राज्यात आता हा हंगाम अंतिम टप्प्यात प्रवेश करत आहे. शेतकऱ्यांनी चालू हंगामात ४४.७४ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरणी केली आहे. सामान्य क्षेत्राच्या तुलनेत रब्बी पिकांनी ९६ टक्के क्षेत्र व्यापले आहे. गेल्या तीन वर्षांत सरासरी ४६.४३ लाख हेक्टर रब्बी पीक क्षेत्र होते. .काही भागात पेरणी अजूनही सुरू आहे. यामुळे आगामी आठवड्यात एकूण पीक क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये गहू हेच रब्बीतील अधिक क्षेत्र व्यापणारे पीक आहे. ज्याचा देशातील एकूण गहू उत्पादनात महत्त्वपूर्ण वाटा आहे. यंदाच्या हंगामात १३.२४ लाख हेक्टरवर गव्हू पेरणी झाली आहे. हे क्षेत्र सर्व रब्बी पिकांमध्ये सर्वाधिक आहे..Wheat Sowing: रब्बीतील गहू पीक पेरणी जवळपास पूर्ण, पिकाची स्थिती चांगली, भरघोस उत्पादनाचा अंदाज.एकूणच, गहू आणि मक्यायासह तृणधान्य पिकांनी आतापर्यंत १४.८३ लाख हेक्टर क्षेत्र व्यापले आहे. कडधान्यांमध्ये, विशेषतः हरभरा पिकांची चांगली वाढ दिसून आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ७.४८ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. तर चालू रब्बी हंगामात हरभरा पिकाखालील क्षेत्र १३ टक्क्यांनी वाढून ८.४७ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. एकूण, कडधान्य पिकांखालील क्षेत्र ११ टक्क्यांनी वाढले आहे. या पिकांनी राज्यभर ८.९६ लाख हेक्टर क्षेत्र व्यापले आहे. .Rabi Sowing: बुलडाण्यात रब्बी पिकांची पेरणी १०० टक्क्यांवर.जिऱ्याची ३.७५ लाख हेक्टरवर लागवडइतर पिकांचे पेरणी क्षेत्रही वाढले आहे. मसाल्यातील जिरे पिकाची सुमारे ३.७५ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे, तर तेलबियातील मोहरी पीक २.७८ लाख हेक्टरवर आहे..बटाटा पीक क्षेत्रातही वाढबटाटा पीक लागवडीतही लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या १.४० लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा बटाटा पीक क्षेत्र १८ टक्क्यांनी वाढून १.६६ लाख हेक्टरवर व्यापले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.