Jalna News: गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण करून बंद केलेले पाणंद, शेत आणि शिवार रस्ते जिल्हा प्रशासनाने अतिक्रमणमुक्त केले आहेत. वर्षभरात १८० शेतरस्त्यांच्या तक्रारींपैकी १६६ अतिक्रमित रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला असून, २७५ कि.मी.चे पाणंद रस्ते प्रशासनाने मोकळे केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे..शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणीसह इतर कामांसाठी तसेच शेतमाल बाजारात पोचविण्यासाठी बारमाही शेतरस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीतील कामांसाठी यंत्रसामग्रीचा वापर वाढत असल्याने शेतापर्यंत जाण्यासाठी चांगले रस्त्यांची कमतरता होती. राज्यात मूळ जमाबंदीवेळी तयार करण्यात आलेल्या नकाशांमध्ये तसेच एकत्रीकरण योजनेवेळी तयार करण्यात आलेल्या गटांच्या गाव नकाशांमध्ये त्यावेळी अस्तित्वात असलेले ग्राम रस्ते, शिव रस्ते, गाडी मार्ग, पाय मार्ग दर्शविण्यात आलेले आहेत. .Farm Road Scheme: बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत विभागीय कार्यशाळा.मात्र, त्यानंतर वेळोवेळी तयार करण्यात आलेल्या नवीन रस्त्यांच्या नोंदी गाव दप्तरी नसल्यामुळे स्थानिक पातळीवर या रस्त्यांच्या वापराबाबत तक्रारी, अतिक्रमण इ. समस्या उद्भवत आहेत. दरम्यान, मागील वर्षभरात शेतरस्त्यांच्या १८० तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. त्या अनुषंगाने कार्यवाही करत १६६ पाणंद रस्ते शेतकऱ्यांना मोकळे करून दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे..Farm Road Scheme: पाणंद, शेतरस्त्यांसाठी स्वतंत्र योजना राबवविणार.परतूर, जालना तालुक्यांत प्रमाण सर्वाधिकप्रशासनाने परतूर आणि जालना तालुक्यांतील सर्वाधिक रस्ते अतिक्रमणमुक्त केले आहेत. यामध्ये परतूर ४५, जालना ३७, बदनापूर २८, भोकरदन ११, जाफराबाद ६, मंठा ११, अंबड १८ आणि घनसावंगी १० असे एकूण १६६ पाणंद रस्ते मोकळे केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली..बळिराजा शेत/पाणंद रस्ते योजना कार्यान्वितमातोश्री ग्रामसमृद्धी शेत, पाणंद रस्ते योजनेसोबतच ग्रामीण भागातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी पूर्णपणे यंत्रसामग्रीच्या साह्याने जलदगतीने कामे करण्याकरिता सोपी व सुलभ कार्यपद्धती असलेली मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना ही महसूल विभागामार्फत राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणंद रस्ते तयार करण्यात येणार आहेत. ही योजना शेतकऱ्यांसाठी पथदर्शी ठरणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.