Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : कोल्हापूर विभागातील ११ साखर कारखान्यांनी २३६ कोटींची एफ.आर.पी थकवली

kolhapur Sugarcane FRP : कोल्हापूर विभागातील १ हजार २०८ कोटींची ऊस बिले आदा केली आहेत, तर साखर कारखान्यांकडे २३६ कोटी रुपये एफआरपी थकीत राहिली आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane Season : राज्यात १५ नोव्हेंबरपासून उसाच्या गळीत हंगामाला सुरूवात झाली. विधानसभा निवडणुकीमुळे लांबलेल्या हंगामाला २५ नोव्हेंबरपासून जोर लागला. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऊस गळीत हंगाम २ महिने पूर्ण झाले आहेत. या विभागात ४० साखर कारखान्यांनी १ कोटी ११ लाख टन ऊस गाळप केले असून १ कोटी १६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. १ हजार २०८ कोटींची ऊस बिले आदा केली आहेत, तर साखर कारखान्यांकडे २३६ कोटी रुपये एफआरपी थकीत राहिली आहे. लागणीचा हंगाम सुरू असून थकीत एफ.आर.पी तातडीने द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

थकीत एफ.आर.पी बाबत कोल्हापूर विभागाचे साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "काही साखर कारखान्यांनी एफ.आर.पी अपुरी दिली आहे. या साखर कारखान्यांना सूचना दिली होती. आता नोटीस बजावली आहे. विभागात १ कोटी ११ लाख टन ऊस गाळप झाले आहे". अशी माहिती मावळे यांनी दिली.

आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले की, "उसाच्या उत्पादन खर्चाचा विचार केल्यास ४ हजार रुपये उसाला दर मिळाला तरच ऊस शेती परवडणार आहे. कारखाने सध्या देत असलेल्या ३ हजार १०० ते ३ हजार २०० रुपये दर न परवडणारा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक कारखाने तो दर सुद्धा वेळेत देत नाहीत. त्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत येत आहे. कायद्याने पहिला हप्ता मुदतीत न देणाऱ्या साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी कायद्याचा बडगा उगारून थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास भाग पाडावे. अन्यथा आम्ही आंदोलन करू". असे चुडमुंगे म्हणाले.

उताऱ्यात कोल्हापूर विभागाची आघाडी

कोल्हापूर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांनी ६ कोटी ८० लाख टन ऊस गाळप केला आहे. ७ कोटी २२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून १०.६३ टक्के सरासरी साखर उतारा पडला आहे. सांगली जिल्ह्यात चार कोटी ३८ लाख टन ऊस गाळप करून चार कोटी ३९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. येथील साखर उतारा सरासरी १०.०१ टक्के आहे, तर कोल्हापूर विभागाचा साखर उतारा १०.३९ टक्के राहिला आहे.

११ साखर कारखान्यांची एफ.आर.पी थकीत

विभागात १३ जानेवारी अखेर कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर कारखाना साडेसात लाख टन ऊस गाळप करून प्रथम क्रमांकावर तर, वारणा कारखाना साडेसहा लाख टन ऊस गाळप करून दुसऱ्या क्रमांकावर आहे. रेणुका शुगर इचलकरंजी हा कारखाना १२.०७ टक्के उतारा घेऊन विभागात आघाडीवर आहे.

विभागामध्ये डिसेंबर अखेर उसाची एफ. आर. पी १ हजार २०८ कोटी रुपये अदा केली असून, २३६ कोटी १६ लाख रुपये थकीत आहेत. तर ११ साखर कारखान्यांनी अपुरी एफ. आर पी दिली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT