Sugarcane Crushing Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : मंगळवेढा तालुक्यात ११ लाख टन उसाचे गाळप

Sugarcane Production : मंगळवेढा तालुक्यातील कारखान्यांनी मिळून आतापर्यंत ११ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तर या गाळपातून १० लाख साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे.

Team Agrowon

Solapur News : मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर येथील आवताडे शुगर, मंगळवेढ्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना, लवंगीतील भैरवनाथ शुगर व कचरेवाडीतील युटोपियन शुगर या चार साखर कारखान्यांनी मिळून आतापर्यंत ११ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तर या गाळपातून १० लाख साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे.

गाळप हंगाम अजून सुरूच असून, १५ मार्चपर्यंत या चारही साखर कारखान्यांची धुराडी पेटलेली असणार आहेत. दरम्यान, गाळपात अनुक्रमे आमदार समाधान आवताडे यांचा आवताडे शुगर, माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा युटोपियन शुगर, शिवानंद पाटील अध्यक्ष असलेला व तालुक्यातील एकमेव सहकारी असलेला श्री संत दामाजी शुगर तर सावंत बंधूंचा भैरवनाथ शुगर असा क्रमांक लागतो.

दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वच साखर कारखान्यांचे गाळप कमी होताना दिसून येत आहे. मागील वर्षी मंगळवेढ्यातून सुमारे १७ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. त्या तुलनेत यंदा कमी-अधिक प्रमाणात गाळप होताना दिसत आहे. याला दुष्काळी परिस्थिती कारणीभूत आहे. तरीही यंदा चारही साखर कारखान्यांकडून माहिती घेतली असता चालू वर्षी १५ ते १६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप अपेक्षित आहे.

आकडे बोलतात..

कारखाने गाळप साखर पोती

आवताडे शुगर गाळप २ लाख ९० हजार मे. टन साखर पोती २ लाख ६९ हजार ३००

युटोपियन शुगर गाळप २ लाख ८९ हजार मे. टन साखर पोती अंदाजे २ लाख ३० हजार

श्री संत दामाजी शुगर गाळप २ लाख ५५ हजार ७५५ मे. टन साखर पोती २ लाख ५१ हजार ९५०

भैरवनाथ शुगर गाळप २ लाख ४० हजार मे. टन साखर पोती २ लाख २० हजार

चालू वर्षी उसाचा उतारा कमी आहे. ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र असा गाळप हंगाम सुरू आहे. चालू वर्षी चार लाख ५० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप अपेक्षित आहे. सभासदांच्या शेतातील संपूर्ण ऊस गाळप केल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे पुढील वर्षी गाळप हंगाम अडचणीचा ठरणार आहे.
शिवानंद पाटील, अध्यक्ष, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT