Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : फळ पीकविम्यासाठी जळगावात १०११ शेतकऱ्यांचे प्रस्ताव

Crop Insurance Scheme : १ ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांचे प्रस्ताव स्वीकारले जात असून, सोमवारपर्यंत (ता. १६) या पिकांसाठी एकूण १०११ शेतकऱ्यांनी आपले विमा प्रस्ताव किंवा अर्ज सादर केले आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून रब्बी हंगाम अंतर्गत आंबिया बहरासाठी केळी, मोसंबी व पपई या पिकांना विमा संरक्षण दिले जात आहे. १ ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांचे प्रस्ताव स्वीकारले जात असून, सोमवारपर्यंत (ता. १६) या पिकांसाठी एकूण १०११ शेतकऱ्यांनी आपले विमा प्रस्ताव किंवा अर्ज सादर केले आहेत.

जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी (एआयसी) या योजनेसंबंधी कामकाज करीत आहे. शेतकरी बँका, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या व कॉमन सर्व्हीस सेंटर (सीएससी) यांच्या माध्यमातून आपले विमा संरक्षणाचे प्रस्ताव सादर करीत आहेत. यात केळी पिकासाठी एक हजार पाच शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केले आहेत. यातून केळीसंबधीचे एक हजार पाच हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे.

पपई पिकासाठी एका शेतकऱ्याने प्रस्ताव सादर केला असून, एक हेक्टरसाठी हे विमा संरक्षण घेण्यात आले आहे. तर मोसंबी पिकासाठी पाच शेतकऱ्यांचे अर्ज सादर झाले असून, पाच हेक्टर एवढे क्षेत्रास विमा संरक्षण घेण्यात आले आहे. सर्वाधिक ४७२ अर्ज रावेरातून आले आहेत. त्यापाठोपाठ मुक्ताईनगरातून २४४ आणि यावलमधून १६८ अर्ज सादर झाले आहेत.

जळगाव तालुक्यातून ४९, चोपड्यातून ३१, भुसावळातून १५ अर्ज सादर झाले आहेत. जामनेरातून सात, भडगावातून पाच, बोदवडमधून चार, चाळीसगावातून नऊ, धरणगावातून पाच एवढे अर्ज सादर झाले आहेत. ३१ ऑक्टोबरपर्यंत या योजनेतून केळी, पपई व मोसंबीसाठी आपले विमा प्रस्ताव सादर करू शकतील.

केळी पिकासाठी हेक्टरी १०५०० रुपये, मोसंबीसाठी हेक्टरी चार हजार आणि पपईसाठी हेक्टरी १७५० रुपये एवढा विमा हप्ता शेतकऱ्यांना सादर करायचा आहे. मागील वर्षी १८ ऑक्टोबरपर्यंत या योजनेतून एकट्या केळी पिकाच्या विमा संरक्षणासाठी सुमारे २१ हजार प्रस्ताव सादर झाले होते. परंतु यंदा कमी प्रस्ताव सादर झाले आहेत.

शेतकऱ्यांत जनजागृती

केळी, पपई व इतर फळ पिकांसाठी ही योजना किती लाभदायी आहे, याबाबत भारतीय कृषी विमा कंपनीतर्फे जनजागृती सुरू आहे. या अंतर्गत पारोळा येथे आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते शेतकऱ्यांना विमा पॉलिसी पत्रांचे वितरण करण्यात आले. या वेळी शेतकरी व भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी मिलिंद वाघ उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT