Fruit Crop Insurance : हवामानाधारित फळपीक विमा योजनेत चार पिकांचा समावेश

Crop Insurance Scheme : संत्रा पिकासाठी १७ तर केळीसाठी ११ महसूल मंडले अधिसूचित करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी या विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
Benefit of Fruit Crop Insurance
Benefit of Fruit Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Akola News : जिल्ह्यात आंबिया बहारासाठी पुनर्रचित हवामानाधारित फळपीक विमा योजनेत संत्रा, केळी, मोसंबी व डाळिंब ही चार फळपिके समाविष्ट करण्यात आली आहेत. संत्रा पिकासाठी १७ तर केळीसाठी ११ महसूल मंडले अधिसूचित करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी या विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

योजनेत संत्रा पिकासाठी हेक्टरी विमा संरक्षित रक्कम २६ हजार ६६७ असून, विमा हप्ता एक हजार ३३३, केळी पिकासाठी हेक्टरी विमा संरक्षित रक्कम ४६ हजार ६६७ असून हप्ता दोन हजार ३३३, मोसंबी पिकासाठी हेक्टरी विमा संरक्षित रक्कम २६ हजार ६६७ व हप्ता एक हजार ३३३ आणि डाळिंबासाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी ४३ हजार ३३३ व या पिकासाठी दोन हजार १६७ रुपये विमा हप्ता रक्कम आहे.

Benefit of Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance : फळपीक विम्याचे बोगस साडेचौदा हजार प्रस्ताव रद्द

संत्रा पिकासाठी अकोट, तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील अकोट, उमरा, पणज, अकोलखेड, तेल्हारा, माळेगाव बाजार, हिवरखेड, अडगाव बुद्रूक, पातूर, आलेगाव, बाभूळगाव, राजंदा, महान, खेर्डा बुद्रूक, कुरुम, हातगाव व निंबा अशी १७ महसूल मंडले अधिसूचित आहेत. डाळिंबासाठी अकोला व बार्शिटाकळी तालुक्यांतील कौलखेड, शिवणी व महान ही तीन मंडले अधिसूचित आहेत.

Benefit of Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance : फळपिकांसाठी ७८६ कोटी रुपयांची विमा भरपाई

मोसंबीसाठी पातूर तालुक्यातील पातूर मंडल अधिसूचित आहे. केळीसाठी अकोट, तेल्हारा, पातूर, बार्शिटाकळी या तालुक्यातील पणज, उमरा, अकोलखेड, अकोट, तेल्हारा, माळेगाव बाजार, हिवरखेड, अडगाव बुद्रूक, चान्नी, बार्शिटाकळी, धाबा ही मंडले अधिसूचित आहेत.

शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामानाधारित फळपीक विमा योजनेत विमा संरक्षण मिळण्यासाठी मोसंबी व केळी या फळपिकासाठी ३१ ऑक्टोबर २०२३, तर डाळिंबाकरिता १४ जानेवारी २०२४ व संत्रा फळपिकासाठी ३० नोव्हेंबर २०२३ या अंतिम दिनांकापूर्वी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच विमा कंपनी प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही किरवे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com