Farmers Issue  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Issue : ‘त्या’ १०१ शेतकऱ्यांचे वारस मदतीविना पाच महिन्यांपासून निधी नाही; नव्या वर्षातही शेतकरी आत्महत्येच्या २८ घटना

Farmer Death : जिल्ह्यात नेसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र मागील सहा वर्षापासून सुरूच आहे. २०२४ मध्ये जिल्ह्यातील १६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर २०२५ मध्ये आजपर्यंत २८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

Team Agrowon

Nanded News : नांदेड : जिल्ह्यात नेसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र मागील सहा वर्षापासून सुरूच आहे. २०२४ मध्ये जिल्ह्यातील १६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर २०२५ मध्ये आजपर्यंत २८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

परंतु या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसाला देण्यासाठी पैसे नसल्यामुळे मागील पाच महिन्यांपासून १०१ प्रकरणात वारस मदतीसाठी शासनाकडे याचना करीत आहेत.

नांदेडमध्ये मागील सतरा वर्षांपासून शेतकरी आत्महत्या होत आहेत. यात २०१४ पासून वाढ झाली. सततचा ओला किंवा कोरडा दुष्काळ, कर्जाचा वाढणारा डोंगर यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत.

जिल्ह्यात सतत चार वर्षे शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामना करावा लागला. कधी कोरडा दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी. यातूनही चुकून समाधानकारक पाऊस पाणी झालेच तर अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जातात. काही दिवसांच्या पावसातच महिनाभराची सरासरी गाठली जाते. यामुळे निर्सगावर अवलंबून असलेला हंगाम हातून जातो. यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नाही. यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असल्याचे दिसून येत आहे.

२०२४ या वर्षातही १६७ शेतकरी आत्महत्या झाल्या तर २०२५ मधील अडीच महिन्यात २८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. या काळातील केवळ ६९ प्रकरणात आत्महत्याग्रस्तांच्या वारसाना मदत देण्यात आली. परंतु मागील पाच महिन्यापासून शासनाने निधी दिला नसल्याने जिल्ह्यातील तब्बल १०१ प्रकरणात एक कोटी एक लाख रुपयांचा निधी प्रलंबित आहे.

मागील वर्षी मे २०२४ आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये ५४ लाख निधी मिळाला होता. यानंतर पाच महिन्यांपासून शासनाने निधी दिला नसल्याने प्रशासनाकडे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला देण्यासाठी पैसे नाहीत. जिल्हा प्रशासन शेतकरी आत्महत्याग्रस्तांच्या वारसांसाठी विभागीय आयुक्तांकडे निधीची मागणी अनेकवेळा मागणी नोंदवली आहे. तर आत्महत्याग्रस्तांचे वारस मात्र मदतीसाठी शासकीय कार्यालयाकडे चकरा मारत आहेत.

दहा वर्षांत १५७५ आत्महत्या

जिल्ह्यात मागील दहा वर्षांत १५७५ शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. यात २०१४ मध्ये ११९, २०१५ मध्ये १९०, २०१६ मध्ये १८०, २०१७ मध्ये १५३, २०१८ मध्ये ९८, २०१९ मध्ये १२२, २०२० मध्ये ७७, २०२१ मध्ये ११९ तर २०२२ मध्ये १४७, २०२३ मध्ये १७५ तर २०२४ मध्ये १६७ तर २०२५ मधील १५ मार्चपर्यंत २८ घटना घडल्या आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahabeej Biofertilizers: जैविक निविष्ठांच्या विक्रीतून ‘महाबीज’ला २.३९ कोटींचा महसूल

Vidarbh Fuel Shortage: विदर्भात ऐन खरीप हंगामात डिझेल टंचाईचा फटका

Nanded Diesel Shortage: नांदेडमध्ये पेट्रोल-डिझेल उपलब्धतेबाबत संभ्रम

Cotton, Soybean Rate: कापूस, सोयाबीनमधील तेजी टिकून तूर, मका हरभरा भाववाढीचे संकेत

Solapur Diesel Shortage: पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे ग्रामीण भागातील मशागतीची कामे खोळंबली

SCROLL FOR NEXT