Cashew Processing  Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Subsidy : काजू बीसाठी शेतकऱ्यांना प्रतिकिलो १० रुपये अनुदान

Cashew Rate : राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिकिलो १० रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत शुक्रवारी (ता. ५) घेण्यात आला.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिकिलो १० रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत शुक्रवारी (ता. ५) घेण्यात आला. तसेच गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३० रुपये दर देण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

यंदा काजू बीच्या दरात घट झाल्याने कोकणासह घाटावरील काजू उत्पादकांना फटका बसला होता. तसेच आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काजू उत्पादकांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात काजू पिकाखाली १.९१ लाख हेक्टर क्षेत्र असून, १.८१ लाख टन उत्पादन मिळते.

देशात महाराष्ट्राची काजू उत्पादकता सर्वांत जास्त म्हणजे हेक्टरी ९८२ किलो आहे. यंदा काजू उत्पादकांना बाजारभाव कमी मिळाल्याने १३ मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पणन विभागाने प्रस्ताव मांडण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले होते.

त्यानुसार आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिकिलो काजू बीसाठी १० रुपये किमान ५० किलो आणि कमाल २ हजार किलोच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे.

यासाठी २७९ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. या निर्णयाचा कोकणातील १.३९ लाख काजू उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असे पणन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory: ‘सोमेश्वर’निवडणुकीत सुनेत्रा पवार पॅनेलची मुसंडी

Baramati KVK: कृषी विज्ञान केंद्र बारामतीला पुरस्कार

Madhu Kambikar Death: ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन

AI in Agriculture: ‘एआय’च्या मदतीने मराठवाड्यात एकरी १२५ टन ऊस

Soybean Price: अकोल्यात सोयाबीनचा सरासरी दर ६५०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT