Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Rate : कापसाच्या दरात एक हजाराची घसरण

Cotton Market Update : कापसाचे दर सद्यःस्थितीत ५८०० ते ६७०० रुपयांवर आले आहेत. दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

Team Agrowon

Yavatmal News : हंगामाच्या सुरुवातीला कापसाचे दर ७२०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. गेल्या काही दिवसात कापसाच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. कापसाचे दर सद्यःस्थितीत ५८०० ते ६७०० रुपयांवर आले आहेत. दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

सततच्या पावसामुळे कापसाच्या उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे. कापसाचे दर ७२०० रुपयांच्या पुढे सरकले नसल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली तेजी पाहता कापसाचे दर वाढण्याची शक्यता होती. कापसाचे दर वाढतील, असा तज्ज्ञांचा अंदाज होता.

त्यामुळेच शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबविली होती. दर वाढण्याऐवजी घसरल्याने ऐन हंगामात बाजारात विक्रीला येणाऱ्या कापसाची आवक मंदावली होती. या हंगामात कापसाचे दर सात हजार दोनशे रुपयांच्या वर गेले नाहीत. काही दिवसांत वाढलेले दर खाली आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. दर कोसळल्याने शेतकऱ्यांनी कापूस विकण्याऐवजी घरात साठवणूक केला आहे.

आता पुन्हा दरात घसरण झाली आहे. दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस केंद्राकडे पाठ फिरविली आहे. हंगामाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत कापसाच्या दरात एक हजार रुपयांची घट झाली आहे. हमीभावाच्या तुलनेत दर खाली आल्यानंतरही शासकनाडून अजुनही शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाहीत.

पावसाचा तीस टक्के क्षेत्राला फटका

कापूस निघाल्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने जवळपास ३० टक्के क्षेत्राला फटका बसला आहे. कापूस ओला झाल्याने सद्यःस्थितीत कापसाला पाच हजार आठशे रुपयांपासून दर मिळत आहे. हमीभावानुसार जवळपास एक हजार दोनशे रुपये शेतकऱ्यांना क्विंटलमागे कमी मिळत आहेत.

कापसाचे दर दहा हजारांवर जातील, अशी अपेक्षा होती. यंदा कापसाला सात हजार रुपयांवर भाव मिळाला नाही. आता तर सहा हजार रुपयांवरच दर आले आहेत. दर घसरल्याने शेतकऱ्यांची आणखी आर्थिक कोंडी होत आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरातच आहे.
किशोर तांगडे, शेतकरी, बोरी (चंद्रशेखर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT