Ragi Crop Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Ragi Crop Kolhapur : राधानगरीत १ हजार ७०० हेक्टरवर नाचणीची लागवड

Radhanagari Ragi Crop : राधानगरी तालुक्यात शेतकरीवर्ग खरीप पिकांमध्ये प्रामुख्याने भुईमूग आणि नाचणी या पिकांकडे लक्ष देतो.

sandeep Shirguppe

Kolhapur Ragi Cultivation : राधानगरी तालुक्यात १ हजार ७०० हेक्टरवर नाचणीची लागवड पूर्ण होत आली आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने नाचणीच्या मांडणीची धांदल वेळेत आटोक्यात आली आहे. तालुक्यात शेतकरीवर्ग खरीप पिकांमध्ये प्रामुख्याने भुईमूग आणि नाचणी या पिकांकडे लक्ष देतो. बागायती ऊस आणि भात पिकांनंतर पावसाळी पिकांकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्याचे उत्पन्न घेतले जाते.

नाचणीला पौष्टिकच नव्हे, तर सकस आहार म्हणून मान्यता मिळालेली आहे. शक्तिवर्धक आणि अनेक सूक्ष्म अन्नद्रव्यांनी युक्त असे हे पीक असल्याने अलीकडे याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

‘शक्तीचा खाऊ’ म्हणून अंगणवाडीत मुलांना नाचणीचा लाडू दिला जातो. याशिवाय नाचणीचे पापड, नाचणीच्या कुरवड्या हा ट्रेंड आता घराघरांत पोहोचला आहे. पूर्वीपासूनच ग्रामीण भागामध्ये नाचणीच्या भाकरी आणि आंबिलीला विशेष महत्त्व होते.

मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असलेल्या या धान्याची डोंगरभागातील शेतकऱ्यांना फार मोठी गरज असते म्हणून हे पारंपरिक पीक आजही तितक्याच काळजीने जोपासले आहे. यामध्ये विशेष वेगळे असे वाण नाही. तालुक्यात परंपरागत चालत आलेले तांबडे आणि पांढरे नाचणे एवढ्याच काय त्या नाचणीच्या जाती माहिती आहेत.

सेंद्रिय खतावर येणारे पीक

यंदा डोंगर माथ्यावरील आणि उतारावरील शेतांमध्ये १७०० हेक्टरवर नाचणीची लागवड झाली आहे. रोपवाटिकेतून रोपे आणून त्यांची छोट्या सरीवर फक्त मांडणी करून लागवड केली जाते. उघड्यावर मांडलेल्या या रोपांना मुळे फुटतात आणि पीक जोमाने येते. शंभर टक्के नैसर्गिक आणि सेंद्रिय खतावर येणारे हे पीक म्हणूनही याचा बोलबाला आहे. कृषी विभागाकडून याकडे विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT