Agricultural Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Festival : नांदेडला कृषी महोत्सवात एक कोटीची उलाढाल

कृषी विभाग, आत्मा आणि महिला आर्थिक विकास महामंडळांच्या संयुक्त विद्यमानाने नांदेड येथे ता.१ ते ५ मार्च दरम्यान कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

Team Agrowon

Nanded News : कृषी महोत्सवात सुमारे एक कोटी रुपये किंमतीची उलाढाल झाली. जवळपास २० लाख किंमतीचा शेतमालाचे ऍडव्हान्स बुकिंग झाले आहे. सलग पाच दिवस चाललेल्या महोत्सवामध्ये विविध विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

याकरिता जिल्ह्यातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे (Agriculture Officer Ravi Shankar Chalwade) यांनी दिली.

कृषी विभाग, आत्मा आणि महिला आर्थिक विकास महामंडळांच्या संयुक्त विद्यमानाने नांदेड येथे ता.१ ते ५ मार्च दरम्यान कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

यात जवळपास तीनशे स्टॉलधारकांनी सहभाग घेतला. यामध्ये विशेषतः कृषी निविष्ठाधारक, ठिबक, तुषार, औजारे, मशिनरीचे स्टॉल व इतर कृषी संलग्न विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते.

रविवारी (ता. ५) आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार मोहन हंबर्डे उपस्थितीत समारोप झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी शेतकरी स्टॉलधारक, महिला बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

पाककला स्पर्धा आयोजित...

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ७० उत्सुक महिलांनी आपला सहभाग नोंदवून आपली पाककला सादर केली. यात उत्कृष्ट पाककला सादर करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agniveer: निवृत्त अग्निवीरांना सरकारी नोकरीची संधी, परीक्षा, प्रशिक्षणाची अट नाही- मुख्यमंत्री फडणवीस

Rural Power Supply : वीजपुरवठ्याअभावी पिके संकटात

Farmers Demand: धान खरेदीची मर्यादा एकरी २० क्विंटल करा

Bhima Sugar Factory : ‘भीमा’ कारखान्याकडून यंदा उसाला ३ हजार ११ रुपयांचा दर

Sorghum Varieties: कोरडवाहू क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे कोणते वाण वापरावे?

SCROLL FOR NEXT