Sugarcane Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : पुणे विभागात एक कोटी २१ लाख टन उसाचे गाळप

Sugarcane Season : पुणे विभागात सहकारी आणि खासगी अशा एकूण ३० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगाने सुरू असून, आतापर्यंत एक कोटी २१ लाख ६ हजार टन उसाचे गाळप झाले आहे.

Team Agrowon

Pune News : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम मध्यावर आला आहे. पुणे विभागात सहकारी आणि खासगी अशा एकूण ३० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगाने सुरू असून, आतापर्यंत एक कोटी २१ लाख ६ हजार टन उसाचे गाळप झाले आहे.

त्यातून एक कोटी १५ लाख ८८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा सरासरी ९.५७ टक्के एवढा आहे, अशी माहिती प्रादेशिक कार्यालयाच्या सुत्रांनी दिली. कराडमधील यशवंतराव मोहिते व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने साखर उताऱ्यात मोठी आघाडी घेतली आहे.

पावसामुळे साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात सुरुवातीच्या काळात काहीशा अडचणी आल्या होत्या. त्यानंतर गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखान्यांनी केले. पुणे विभागात सातारा, पुणे भागात उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी वेळेवर झालेल्या पावसामुळे उसाच्या तीन लाख हेक्टरपर्यंत लागवडी झाल्या असल्याची स्थिती आहे.

त्यापैकी यंदा गाळपासाठी सुमारे अडीच लाख हेक्टरहून अधिक ऊस उपलब्ध आहे. शासनाने १ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कारखाने सुरू झाले आहेत. सध्या निम्म्याहून अधिक क्षेत्रावरील उसाचे गाळप झाल्याचे चित्र आहे. यंदा कमी झालेल्या पावसामुळे उसाची पुरेशा प्रमाणात वाढ न झाल्यामुळे ऊस तोडणी वेगात सुरू आहे.

सध्या सुरू असलेल्या कारखान्यामध्ये सहकारी १७ व खासगी १३ साखर कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता दोन लाख ३ हजार ७०० टन एवढी आहे. विभागात आत्तापर्यंत ३० कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात गाळप केले आहे. आतापर्यंत झालेल्या गाळपामध्ये बारामती अॅग्रो कारखान्याने सर्वाधिक आघाडी घेतली. तर, कराडमधील यशवंतराव मोहिते व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे.

या कारखान्याचा १२ टक्क्यांएवढा साखर उतारा आहे. विभागात सहकारी साखर कारखान्यांनी ६५ लाख ४७ हजार ३६० टन उसाचे गाळप केले. त्यातून ६८ लाख १० हजार २५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. तर,

साखर उतारा सरासरी १०.४ टक्के एवढा होता. खासगी साखर कारखान्यांनी ५५ लाख ५८ हजार ८१५ टन उसाचे गाळप केले. त्यातून ४७ लाख ७७ हजार ७६५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. साखर उतारा सरासरी ८.५९ टक्के एवढा होता.

जिल्हानिहाय उसाचे गाळप, साखर उत्पादन

जिल्हा कारखान्यांची संख्या उसाचे गाळप, टन साखर उत्पादन, क्विंटल साखर उतारा, टक्के

पुणे १४ ६४,७०, २०४ ६१,७६,९१५ ९.५५

सातारा १६ ४९,७६,४४१ ५१,९२,६५४ १०.४३

एकूण ३० १,२१,०६,१७५ १,१५,८८,०१५ ९.५७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT