Maize Agrowon
बाजारभाव बातम्या

वाढत्या निर्यातीमुळे मका बाजार तेजीत

मक्याचे जागतिक उत्पादन १२० कोटी टन तर खप ११९ कोटी टन राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे खपाच्या तुलनेत जागतिक उत्पादन केवळ एक कोटी टनाने अधिक आहे.

- दीपक चव्हाण

दिवाळीनंतर प्रमुख बाजारसमित्यांमध्ये चांगल्या दर्जाच्या मक्याला (Maize) प्रति क्विंटल १६५० रुपयापर्यंत भाव होते. ज्यांनी संयम दाखवून थोडी वाट बघितली, त्या शेतकऱ्यांना संक्रात ते होळी या दरम्यान किफायती बाजारभाव (Market price) मिळाले. पुढील चित्र काय राहील, याबद्दल शेतकऱ्यांच्या जाणून घ्यायचे आहे. होळीपासून ते दिवाळीपर्यंतचा काळ पकडला तर मक्याचे (Maize) दर चांगले राहण्याची चिन्हे दिसत आहेत. देशांतर्गत आणि जागतिक मागणी, त्या तुलनेत मर्यादीत पुरवठा, रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली पुरवठा कोंडी, तसेच हवामान बदलल्यामुळे मक्याच्या जागतिक उत्पादनात घट येण्याची धास्ती या कारणांमुळे मका (Maize) बाजाराला चांगलीच झळाळी आली आहे. अमेरिकेचा (America) मे मका वायदा हा दहा वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.

भारतात पोल्ट्री व स्टार्च उद्योग हे मक्याचे मुख्य ग्राहक आहेत. देशातील साधारण पावणे तीन कोटी टन मका उत्पादनातील ५० ते ५५ टक्के मका (Maize) हा पोल्ट्री उद्योगात तर १५ ते १८ टक्के मका (Maize) हा स्टार्च उद्योगात खपतो. कोविडनंतर औषधनिर्मिती उद्योगाकडून स्टार्च उत्पादनांची मागणी वाढली. भारतातील बहुतांश स्टार्च प्लांट हे पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. मक्याचा खप वाढण्याच्या दृष्टीने ही जमेची बाजू ठरली आहे.

मक्याच्या (Maize) दृष्टीने दुसरी चांगली बातमी अशी की दीर्घकाळ विविध संकटांचा सामान केल्यानंतर पोल्ट्री उद्योगाच्या मार्जिन्समध्ये सध्या चांगली सुधारणा दिसत आहे. खास करून ब्रॉयलर्स पोल्ट्री (Poultry) उद्योगाला चांगले दिवस आले आहेत. ब्रॉयलर पोल्ट्रीच्या(Poultry अलीकडच्या इतिहासात एखाद्या महिन्यात प्रथमच प्रति किलो १२५ रुपये लिफ्टिंग रेट मिळण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. रिटेल मार्केटमध्येही प्रति किलो २५० रुपयांचा टप्पा पार झाला. त्याला ग्राहकांकडून फारसा विरोध होताना दिसत नाही. म्हणजे ही दरपातळी ‘बेंचमार्क' म्हणून नव्याने रूढ होत आहे. ब्रॉयलर पोल्ट्री(Poultry आणि एकूणच मक्याच्या शेतीसाठी हे चांगले चिन्ह आहे.

अंड्यावरील पक्ष्यांचा उद्योग (लेअर पोल्ट्री) सध्या अडचणीत आहे; पण एप्रिलपासून पुढे त्यातही सुधारणा अपेक्षित आहे. चालू महिन्यात अंड्याची फार्मगेट किंमत साडेतीन रुपये तर उत्पादन खर्च साडेचार रुपये अशी परिस्थिती राहिली आहे. दीर्घकाळ इतका मोठा तोटा कुठलाही उद्योग सहन करू शकत नाही. त्यामुळे पुढील काळात उत्पादन नियंत्रित होण्याचे संकेत मिळत आहे. शिवाय, उन्हाळ्यात नैसर्गिकरित्या अंड्याचे उत्पादन कमी होत असते. यामुळे अंड्याच्या बाजारात (Egg Market) आणि लेअर पोल्ट्रीच्या मार्जिन्समध्ये येत्या तिमाहीत तुलनेने सुधारणा दिसेल. पर्यायाने मक्यासारख्या प्रमुख कच्च्या मालाच्या मागणीतही सातत्य राहिल.

निर्यातवाढीचा फायदा
भारतातून सातत्याने मका निर्यात (Export) वाढत आहे. फेब्रुवारीत ३.६ लाख टन मका निर्यात झाल्याचा अंदाज आहे. युक्रेन- रशिया(Ukraine Russia) युद्धापूर्वीच भारतीय मक्याला जोरदार उठाव होता. युद्ध सुरू झाल्यावर मागणी आणखी वाढली आहे. युक्रेनचा जागतिक मका निर्यातीत १७ टक्के वाटा आहे. एप्रिल आणि मे महिन्यात युक्रेनमध्ये मक्याची पेरणी होत असते. सध्याच्या युद्धामुळे पेरणी रखडण्याची किंवा क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दीर्घकालीन विचार करता जागतिक पुरवठा कमी राहण्याची शक्यता गडद झाली आहे. त्यामुळे मक्याचे भाव तेजीत आहेत.

चालू आर्थिक वर्षांत एप्रिल ते जानेवारी दरम्यान भारतातून ८१६ मिलियन डॉलर किमतीचा मका निर्यात झाला. साधारण ३१ लाख टन मका (Maize) निर्यात झाला. त्या तुलनेत सोयापेंड (डीओसी) निर्यात मात्र घटली आहे. जागतिक बाजाराच्या तुलनेत भारतीय सोया डीओसी महाग पडत असल्याने निर्यात ७० टक्के घटली आहे. सध्याच्या वेगाने मका निर्यात (Export) सुरू राहिली तर ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत देशांतर्गत बाजारात तुटवडा पडण्याची शक्यता आहे. दरमहा सरासरी चार लाख टन हा हिशोब धरला तरी २४ लाख टन मका (Maize) देशाबाहेर जाईल.

Maize

एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्याची मक्याची एकूण देशांतर्गत गरज ११० ते १२५ लाख टन राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रब्बी मक्याचे उत्पादन १०० लाख टन राहण्याचा अंदाज आहे. खरीपातील शिल्लक साठा (कॅरिओव्हर) निर्यातीमुळे (Export) कमी झाला. पुढील काळातही निर्यातीचा वेग असाच राहिला तर त्या देशांतर्गत तूट निर्माण होवू शकते.

यंदा बिहारमधील रब्बी मक्याचे (Maize)क्षेत्र हे विक्रमी पातळीपर्यंत सुधारले आहे. एप्रिल ते जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत देशांतर्गत बाजारात बिहारचा मका(Corn) आलेला असेल. बाजारात सुमारे ३० लाख टन मक्याचा पुरवठा अपेक्षित आहे. या दरम्यान, अवकाळी पाऊस झाला तर आवक लांबू शकते. बिहारनंतर उत्तर प्रदेशातील कन्नौज विभागातील आवक सुरू होते. महाराष्ट्रातही बिहार व उत्तर प्रदेशमधील मालाची थेट आवक होत असते. या वर्षी महाराष्ट्रात खानदेशातून मक्याची उपलब्धता चांगली राहणार आहे. एप्रिल-मेमध्ये स्थानिक आवक प्रामुख्याने राहील. जूनमध्ये मात्र उत्तर भारतातील मक्याला महाराष्ट्रासाठी पडतळ येऊ शकेल. देशात उन्हाळ (Summer) हंगामात सुमारे आठ लाख हेक्टर क्षेत्रावर मक्याचा पेरा होण्याची शक्यता आहे. यातील प्रमुख वाटा हा कन्नोज विभागाचा असेल. ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात उन्हाळी मक्याचा चांगला पुरवठा राहिल.

महाराष्ट्रातील मका पेरा
जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामात ८७ हजार हेक्टरवर मक्याची पेरणी (Sowing) झाली असून, सरासरीच्या ५१ टक्के अधिक क्षेत्रवाढ झाली आहे. नंदूरबार, धुळे आणि जळगाव मिळून रब्बीत एक लाख हेक्टर क्षेत्र असून, किमान पाच ते सात लाख टन मका येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत उपलब्ध असेल. राज्यात रब्बी मक्याचा(Maize) अंतिम पेरा साडे तीन लाख हेक्टरवर गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५ टक्के वाढ आहे. शिवाय उन्हाळ हंगामातदेखिल मक्याखालचे क्षेत्र वाढेल. अहमदनगर जिल्ह्यात उसाच्या(Sugar Cane) तोडणीनंतर तिथे सध्या मका पीक (Maize Crop) घेण्याकडे कल आहे.

जागतिक मका उत्पादन
मक्याचे जागतिक उत्पादन (Global production) १२० कोटी टन तर खप ११९ कोटी टन राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे खपाच्या तुलनेत जागतिक उत्पादन केवळ एक कोटी टनाने अधिक आहे. अशा वेळी पाऊसमान थोडेही प्रतिकूल राहिले तर उत्पादन अनुमान खाली येते. खप मात्र स्थिर किंवा वाढता राहतो. आणि ही बाब बाजाराला गती देण्यासाठी पुरक ठरते.

मका हे औद्योगिक पीक (इंडस्ट्रियल क्रॉप) आहे. मानवी आहार, पशुपक्षी खाद्य, स्टार्ट, इथेनॉल अशा विविध क्षेत्रांत त्याचा उपयोग होतो. त्यामुळे मका हे एक शाश्वत मागणी असणारे पीक असून, भारतात वर्षभरात तिन्ही हंगामांमध्ये हे पीक घेतले जाते. योग्य प्रकारे पीक नियोजन केले तर एकरी ३० ते ३५ क्विंटल उत्पादन मिळू शकते. किमान आधारभावाच्या तुलनेत बाजारभाव अधिक राहिले, तर भारतात शेतकऱ्यांकडून (Indian Farmer) चांगला पुरवठा होतो. सध्याची जागतिक व देशांतर्गत मुलभूत स्थिती पाहता किमान आधारभावाच्या वर दीर्घकाळ बाजारभाव (Market) राहतील, असे एकंदर चित्र आहे. सध्याची भावपातळी भारतीय पोल्ट्री व स्टार्च उद्योगाच्या दृष्टीने स्विकारार्ह आहे. निर्यातीसाठीही (Export) चांगली पडतळ येतेय. या सर्व बाबी मका पिकासाठी (Maize Crop) आश्वासक आहेत.

- लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT