
VST Tractor : देशात मंजूर टंचाईमुळे यांत्रिकीकरणाची बाजारपेठ वाढू लागली आहे. शेतकरीही यांत्रिकीकरणाला पसंती देत आहे. परंतु इंधनाचे वाढते दर आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन यांत्रिकीकरणातही विविध प्रयोग करण्यात येऊ लागले आहेत. नुकतीच व्हिएटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेडने 'एफईएनटीएम' ट्रॅक्टर मालिकेची घोषणा केली आहे. या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होईल, असा दावा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केला आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या ट्रॅक्टर्स मालिकेतील ट्रॅक्टर विशेषत आधुनिक व प्रगत शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आहेत. इंधनात बचत करून जास्त ताकद देणारी ही मॉडेल्स आहेत. ही नवी मालिका भारतीय शेतकऱ्यांच्या बदलत्या गरजांना लक्षात घेऊन विकसित करण्यात आल्याचं कंपनीचा दावा आहे.
‘एफईएनटीएम’चा अर्थ 'फ्युएल एफिशियंट अॅन्ड टॉर्क मॅक्स' असा होतो. म्हणजेच कमी इंधनात जास्त कार्यक्षमतेसह ताकद या मालिकेतील ट्रॅक्टरमध्ये देण्यात आली आहे. या ट्रॅक्टर्समध्ये आधुनिक अभियांत्रिकीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यक्षम आणि मजबूत ट्रॅक्टर्सची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच लहान व मध्यम आकाराच्या शेतीसाठी आवश्यक ती सर्व वैशिष्ट्ये असल्याचे कंपनीने प्रसिद्ध पत्रकात सांगितले आहे.
पाच मॉडेल
या नव्या मालिकेत एकूण पाच ट्रॅक्टर मॉडेल्स आहेत. त्यामध्ये १८० एफईएनटीएम , २२४ एफईएनटीएम, २२५ एफईएनटीएम, २७० एफईएनटीएम आणि ९२९ एफईएनटीएम मॉडेलचा समावेश आहे. तसेच ही सर्व मॉडेल्स १८.५ ते २९ अश्वशक्ती (एचपी) श्रेणीतील आहेत.
त्यामध्ये २ व्हील ड्राईव्ह आणि ४ व्हील ड्राईव्ह अशा दोन्ही प्रकारांचा समावेश आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या शेतजमिनींवर सहज वापरून दीर्घकाळ टिकणारी रचना या ट्रॅक्टरमध्ये देण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे.
एफईएनटीएम ट्रॅक्टर्सना केवळ इंधन बचत करणारी यंत्रे म्हणून नव्हे, तर दीर्घकालीन मूल्य देणारी, आरामदायक आणि उत्पादनक्षम यंत्रणा म्हणूनही ओळख दिली जात आहे. चालवताना यामध्ये विशेषतः चालकाच्या आरामाची काळजी घेतली आहे. लहान आकाराच्या शेतात सहज वळणं घेता येतात आणि कोणत्याही हवामानात वापरता येतात, अशी या ट्रॅक्टर्सची रचना असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.