Jalgoan News : राज्यात प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या भरताच्या वांग्यांची आवक विविध बाजारांत स्थिर आहे. शेतकऱ्यांना बाजारात प्रतिकिलो २० ते २५ रुपये व सरासरी २० रुपये दर मागील महिनाभरापासून मिळत आहे. पार्ट्यांसह विविध कार्यक्रमांच्या मेजवानीत भरताचा ‘मेनू’ दिसू लागला आहे.
भरताच्या वांग्यांची आवक दीपोत्सवाच्या काळात जळगावात सुरू होते. ऑक्टोबरच्या सुरवातीला भुसावळ, जळगाव भागात आवक सुरू होते. तर नोव्हेंबरच्या मध्यात यावल, रावेर या भागात भरतांच्या वांग्यांची आवक, काढणी सुरू होते. यंदा भरीत वांग्यांच्या पिकाला अनुकूल वातावरण होते. यामुळे उत्पादनही वेळेत व जोमात येत आहे. सध्या जळगाव, भुसावळ, रावेर येथील बाजारांत भरीत वांग्यांची सर्वाधिक आवक होत आहे. जळगावात रोज १८ ते २० क्विंटल आवक होत आहे. किरकोळ बाजारातील दर ३० ते ४० रुपये प्रतिकिलो आहेत. रावेर, यावल तालुक्यातील लांबट, चमकदार वांग्यांचे दर विविध आठवडी बाजारांत ५० ते ६० रुपये प्रतिकिलो आहेत.
यावलमधील बामणोद, भालोद, न्हावी, पाडळसे, सांगवी बुद्रूक, रावेरातील मस्कावद, रोझोदा, खिरोदा, चिनावल भागातील दर्जेदार वांग्यांना अधिकचा उठाव आहे. तसेच भुसावळातील पिंपळगाव, तळवेल, वरणगाव, शिंदी, पिंप्रीसेकम या भागातही भरीत वांग्यांचे उत्पादन जोमात सुरू आहे. जळगावमधील आसोदा, तरसोद, नशिराबाद, बेळी, जळगाव खुर्द, तुरखेडा, विदगाव या भागांतही भरीत वांग्यांचे उत्पादन
यंदा दिवाळी नोव्हेंबरमध्ये होती. दिवाळीला घरी भरीत-भाकरी-पुरीचा बेत आखला जातो. या काळात दर्जेदार वांग्यांना मोठा उठाव राहतो. यामुळे यावल, रावेर, जळगाव भागातील आठवडी बाजारांत भरताच्या वांग्यांना चांगली मागणी आहे. भुसावळ, जळगाव भागात गोलाकार, मोठ्या आकारातील भरिताची वांगी येत आहेत. तसेच भडगाव, एरंडोल, जामनेर भागातही काही शेतकऱ्यांनी भरीत वांगी पिकाची लागवड केली होती. या भागातही आवक सुरू आहे.
थंडी वाढते, तशी भरताच्या वांग्यांची मागणी सुरू होते. यंदा दिवाळीला थंडीचे आगमन झाले. या काळात वांग्यांना चांगली मागणी आठवडी व इतर मोठ्या बाजारांत होती. दर २० ते ३० रुपये प्रतिकिलो मिळत आहेत.- ज्ञानेश्वर राणे, शेतकरी, पिंपळगाव (जि.जळगाव)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.