Congress Agrowon
ताज्या बातम्या

Farmers Issue : शेतकरी, युवकांच्या प्रश्नावर युवक काँग्रेसचा उद्या विधिमंडळाला घेराव

युवकांमधील बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता. २०) विधिमंडळाला घेराव घालण्यात येणार आहे.

Team Agrowon

Pune News पुणे : युवकांमधील बेरोजगारी (Unemployment), विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या (farmers Issue) याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता. २०) विधिमंडळाला घेराव घालण्यात येणार आहे.

राज्यभरातून २० ते २५ हजार युवक या आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मितेंद्र सिंग व प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत दिली.

प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रशांत ओगले, महिला उपाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग, प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, अक्षय जैन, प्रदेश प्रवक्ते दीपक राठोड, पुणे शहराध्यक्ष राहुल शिरसाट आदी उपस्थित होते.

मितेंद्र सिंग म्हणाले, की युवक आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठीच्या या लढाईत प्रत्येक तालुक्यातून तरुण सहभागी होणार आहेत. कुणाल राऊत म्हणाले, की राज्य सरकारचे युवकांकडे दुर्लक्ष झाले आहे.

महाभरती, एमपीएससी यासोबतच विद्यार्थी आणि युवकांबद्दल राज्य सरकार चुकीची धोरणे राबवित आहे. महाराष्ट्रातील अनेक बडे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. परिणामी बेरोजगारी वाढत आहे. इतर राज्यांत बेरोजगार भत्त्याची तरतूद आहे. ही तरतूद महाराष्ट्रातही व्हायला हवी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Winter Session 2025 : पंतप्रधानांना धमकी दिल्याचा सत्ताधाऱ्यांचा कॉंग्रेसवर आरोप; लोकसभेत गदारोळ

PM Kisan Yojana: कर्ज न फेडल्यास बँक थांबवू शकते का पीएम किसानचा हप्ता? वाचा महत्त्वाचा निर्णय

Indian Economy: आर्थिक आकडेवारीच्या खोलात शिरण्याची गरज

Agriculture Privatization: खासगीकरण हवे शेतकरी केंद्रित

Election Transparency: निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT