Yellow Mosaic On Rajma Agrowon
ताज्या बातम्या

Yellow Mosaic On Rajma : ‘पिवळा मोझ्याक’चा राजमा पिकावर प्रादुर्भाव

राजमा पिकावर ‘पिवळा मोझ्याक’ म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव आल्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Team Agrowon

रिसोड, जि. वाशीम : राजमा पिकावर ‘पिवळा मोझ्याक’ (Yellow Mosaic On Rajma) म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव आल्यामुळे उत्पादनात (Rajma Production) मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हरभरा पिकाला पर्यायी पीक म्हणून या वर्षी रिसोड तालुक्यात पाचशे एकरांवर राजमा पिकाची लागवड करण्यात आली आहे. सध्या राजमा पीक संपूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर असल्यामुळे राजमा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

रब्बीमध्ये हरभरा व गहू ही महत्त्वाची पिके असून, या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु मागील चार-पाच वर्षांपासून हरभरा उगवल्यानंतर मर (बुरशीजन्य रोग) लागत आहे.

त्यामुळे दरवर्षी हरभऱ्याच्या पिकामध्ये मोठी घट येत असल्यामुळे हरभरा या पिकाला पर्यायी पीक म्हणून तसेच फेरपालट म्हणून राजमा या पिकाची लागवड केली आहे. मागील वर्षी प्रायोगिक तत्त्वावर काही शेतकऱ्यांनी राजमा पिकाची लागवड केली होती.

या पिकांमधून चांगले उत्पन्न मिळाल्यामुळे या वर्षी रिसोड तालुक्यात जवळपास पाचशे एकरांवर राजमा पिकाची लागवड करण्यात आली आहे.

परंतु शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत एकाएकीच राजमा या पिकावर पिवळा मोझ्याकचा प्रादुर्भाव झाला आहे. दोन ते तीन दिवसांत सर्व पीक पिवळे पडले आहे. फवारणी करूनही काही फरक पडला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

मागील वर्षी अर्ध्या एकरावर राजमाची पेरणी केली होती. उत्पन्न चांगले मिळाले होते. म्हणून या वर्षी चार एकर राजमा पेरला आहे. भोकरखेड या गावात तीस एकर राजमा पेरला आहे. मागील सात- आठ दिवसांपासून पीक पिवळे पडून वाळल्यासारखे दिसत आहे.

- संतोष विष्णू लांडगे, शेतकरी, भोकरखेडा, ता. रिसोड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kerala Assmbly : व्हीबी-जी राम जी रद्द करून मनरेगा योजना लागू करा; केरळ विधानसभेत ठराव मंजूर

Post Harvest Value Addition: कर्नाटकात भात पीक काढणीपश्चात मूल्यवर्धनाचं मॉडेल, चार-पाच पट अधिक उत्पन्नाची हमी

Rural Governance: गावगाड्याचा विकास कधीपर्यंत वाऱ्यावर?

India US Trade Deal: ...तर २०२०-२१ च्या शेतकरी आंदोलनाची पुनरावृत्ती होईल, भारत- अमेरिका करारावरून शेतकरी संघटनांचा इशारा

Agricultural Waste : पिकांच्या काढणीनंतर उरलेल्या अवशेषांपासून पॅकेजिंग साहित्याची होणार निर्मिती; शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न?

SCROLL FOR NEXT