Team Agrowon
राजमा हे पीक सध्या उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू येथेच मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे या पिकाला फारशी स्पर्धा नाही.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी राजमा पिकाचा हरभऱ्याला पर्याय म्हणून विचार करावा.
राजमा हे ७० ते ८० दिवसात तयार होणारे पीक असून ते हरभरा पिकाला पर्याय ठरत आहे.
राजम्यामध्ये जीवनसत्व व प्रथिने भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे त्याला बाजारपेठेतही चांगली मागणी आहे.
महाराष्ट्रातील हवामान लक्षात घेता वरुण, फुले राजमा या जाती फायदेशीर असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
तांबेरा रोगाव्यतीरिक्त इतर कोणत्याही गंभीर कीड, रोगाचा पिरणाम या पिकावर होत नाही.