Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा `येलो अलर्ट`

राज्याच्या काही भागांत शुक्रवारी पावसानं हजेरी लावली होती. मात्र बहुतांश भागांत पावसाची उघडीप होती.

टीम ॲग्रोवन

राज्याच्या काही भागांत शुक्रवारी पावसानं (Rainfall) हजेरी लावली होती. मात्र बहुतांश भागांत पावसाची उघडीप होती. हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Heavy Rain Yellow Alert) जारी केलाय.

कोकणात पावसाचा जोर कमी आहे. पालघर जिल्ह्यात जव्हार, विक्रमगड आणि वाडा या मंडळांमध्ये हलक्या पडल्या. रायगड जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण कमी होतं. माथेरान, पनवेल आणि उरन या मंडळांमध्ये हलक्या सरी झाल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून, गुहागर या भागांत हलक्या पावसानं हजेरी लावली होती. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या सरी पडल्या.

मध्य महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात पावसाची उघडीप कायम होती. धुळे जिल्ह्यातही पाऊस नव्हता. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव आणि जळगाव मंडळांत हलक्या सरी पडल्या. नंदूरबार जिल्ह्यातही तीन मंडळांमध्ये पावसाचा शि़डकावा झाला. तर कोल्हापूर जिल्ह्यातील गगणबावडा येथे ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर पन्हाळा, राधानगरी, घाहूवाडी आणि चंदगड मंडळात पावसाची भूरभूर सुरु होती. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, पेठ आणि हर्सूल मंडळांमध्ये हलक्या पावसाच्या सरी पडल्या. तर पुणे जिल्ह्यातील बारामती, लोणावळा आणि पुणे मंडळात पाऊस झाला. सांगली, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातही पावसाची उघडीप होती.

मराठवाड्यताही पावसानं विश्रांती घेतली होती. औरंगाबाद,जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी पाऊस पडला नाही. तर विदर्भातील अकोला, अमराती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाची उघडीप होती. तर गोंदीया जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये पावसाचा शिडकावा झाला. नागूपर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातही पावसाची उघडीप कायम होती.

मात्र भारतीय हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला. तर मराठवाड्यातील लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली तसेच पूर्व विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदीया आणि भंडारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट वर्तविण्यात आलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT