Rain Update
Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : पावसाची उघडीप कायम राहणार का?

टीम ॲग्रोवन

राज्याच्या बऱ्याच भागांत पावसाचा जोर (Rain Intensity In Maharashtra) कमी झाला. मंगळवारी राज्यात ठिकठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी (Rainfall) लावली. मराठवडा आणि विदर्भात पावसानं अनेक भागांत विश्रांती घेतली. हवामान विभगाने (Weather Department) उद्या सकाळपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट (Rain Orange Alert) जारी केलाय.

कोकणात बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी झाला. पालघर जिल्ह्यातील तालसरी येथे १०० मिलिमीटर पाऊस झाला. तर डहाणू, जव्हार, वाडा येथेही मध्यम स्वरुपाच्या सरी झाल्या. रायगड जिल्ह्यातही पाऊस कमी झाला. माथेरान येथे सर्वाधिक ८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर महाड, म्हसला, पेण आदी मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. रत्नागिरी जिल्ह्यातही सर्वत्र हलका पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतेक सर्वच मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. कोकणात पावसाचा जोर कमी झाल्याने शेतीकामांना वेग आलाय.

मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये काही मंडळांत जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात काही मंडळांमध्ये मध्यम सरी पडल्या. तर अनेक भागांत हलक्या सरी झाल्या. धरणक्षेत्रात मात्र पावसाचा जोर काहीसा अधिक होता. कोल्हापूर जिल्ह्यात काही मंडळांमध्ये हलका पाऊस पडला. गगणबावडा तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. नाशिक जिल्ह्यातील काही मंडळांत मध्यम सरी झाल्या. इगतपुरी मंडळात सर्वाधिक ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सुरगणा मंडळातही जोरदार पाऊस झाला. तर पेठ तालुक्यातही अनेक ठिकाणी काही वेळ जोरदार पाऊस झाला.

नगर जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलक्या सरी पडल्या. मात्र पावसाचा जोर कमी होता. धुळे जिल्ह्यातही काही मंडळात पाऊस झाला. साक्री आणि शिरपूर मंडळांत पाऊस काहीसा अधिक होता. तर जळगाव जिल्ह्यातही काही मंडळांमध्ये पावसाची भूरभूर सुरु होती. बोडवड आणि जामनेर येथे काही वेळ मध्यम सरी पडल्या.

मराठवाड्यातही काही मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद, पैठण, गंगापूर या तालुक्यांतील काही मंडळांमध्ये हलका पाऊस झाला. तर इतर ठिकाणी पावसाची उघडीप होती. बीड जिल्ह्यात पावसाची उघडीप कायम होती. हिंगोली, जालना आणि लातूर जिल्ह्यांतही पावसाने विश्रांती घेतली. तर उस्मानाबाद, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील काही भागांत हलक्या सरी पडल्या.

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसानं हजेरी लावली. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, बार्शी टाकळी, बाळापूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडला. तर अमरावती जिल्ह्यातील धरनी, चिखलदा, या मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर, साकोली, पवनी आणि लखनी मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. बुलडाणा जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलका पाऊस झाला. गडचिरोली जिल्ह्यात मात्र बहुतेक मंडळांत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. कोर्ची, कुरखेडा, धानोरा, चार्मोशी या मंडळांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. तसेच गोंदीया, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातही काही मंडळांत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.

दरम्यान, हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत कोकणातील रायगड आणि पालघर जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. यासोबतच कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane FRP : सोलापुर जिल्ह्यात २५७ कोटींची ‘एफआरपी’ थकित

Vegetable Production : भाजीपाला उत्पादनाचे गणित बिघडले

Summer Heat : उन्हाच्या तीव्रतेचा फळे, भाजीपाला उत्पादनावर परिणाम

Crop Damage Subsidy : पीकनुकसानीचे ८८ कोटींवर अनुदान ‘अपलोड’

Dungmanure Shortage : बागायतदारांना शेणखताचा तुटवडा

SCROLL FOR NEXT