Vegetable Production : भाजीपाला उत्पादनाचे गणित बिघडले

Vegetable Farming : उन्हाळी हंगामात मागणी व मिळणारा दरामुळे भाजीपाला लागवडीचे नियोजन असते. मात्र मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा सूर्य अधिक आग ओकत असल्याची परिस्थिती आहे.
Vegetable Farming
Vegetable Farming Agrowon

Nashik News : उन्हाळी हंगामात मागणी व मिळणारा दरामुळे भाजीपाला लागवडीचे नियोजन असते. मात्र मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा सूर्य अधिक आग ओकत असल्याची परिस्थिती आहे. जिल्ह्यात अनेक भागांत जवळपास ४० अंश सेल्सिअसच्या आसपास तर अनेक ठिकाणी ४० अंशांवर तापमान आहे. परिणामी लागवडी अडचणीत आल्या असून फुलधारणा व फळधारणेत प्रामुख्याने अडचणी आहेत. उत्पादन व गुणवत्तेवर मोठा परिणाम दिसून येत आहे.

जिल्ह्यात उपलब्ध पाण्याचे अनुषंगाने नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, कळवण, सटाणा, चांदवड, निफाड व सिन्नर या तालुक्यांमध्ये भाजीपाला लागवडीचे शेतकरी नियोजन करत असतात. मात्र एप्रिलच्या पहिल्या सप्ताहापासूनच तापमानात ४० अंशांपर्यंत वाढ दिसून आली. बुधवारी (ता, ८) निफाड संशोधन केंद्राच्या नोंदीनुसार जमिनीचे तापमान १० सेमीपर्यंत ३७.७ अंश सेल्सिअस होते. तीव्र सूर्यकिरणांचा लागवडीवर परिणाम दिसून आला. ज्यामध्ये प्रामुख्याने मिरची, टोमॅटो व वेलवर्गीय पिकांमध्ये कारले, दोडका, गिलके, भोपळा, वालपापडी अशा पिकांमध्ये समस्या मोठी आहे. परिणामी पाणी उपलब्ध नसल्याने काही शेतकऱ्यांनी लागवडी काढून टाकल्या आहेत.

Vegetable Farming
Vegetable Cluster : जुन्नरला रसायनमुक्त भाजीपाला क्लस्टर उभारणार - अजित पवार

उपाययोजना ठरतील महत्त्वाच्या

आपत्कालीन परिस्थितीत संरक्षित पाण्याची गरज असते. त्यामुळे सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी देण्याचा पर्याय पिकांसाठी चांगला आहे. जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी बाष्पीभवन प्रतिरोधक उपाययोजनेमध्ये सिलिकॉनयुक्त खताचा वापर, सेंद्रिय आच्छादन किंवा पीक आच्छादन वापरणे महत्त्वाचे आहे, असे के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे प्रा. तुषार उगले यांनी सांगितले.

...या आहेत अडचणी

फळभाज्यांमध्ये फळे नरम पडणे, अपेक्षित वाढ व आकार न होणे

परागीभवनामध्ये परागकण शुष्क होत असल्याने फळ निर्मितीवर परिणाम

वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये कारले, गिलके, भोपळा, दोडका, घेवडा, वाल पापडीमध्ये फूलधारणा होण्यात अडचणी

फळभाजीमध्ये टोमॅटो, शिमला मिरची यात फूलगळ अधिक

मेथी, कोथिंबीर, पालक यांच्या उगवण क्षमतेवर परिणाम तर काही ठिकाणी उगवून आल्यानंतर वाढीत अडचणी

फ्लॉवर, कोबी या कंदवर्गीय पिकात आकार व वाढ होण्यात अडचणी

पाण्याअभावी व वाढत्या उष्णतेमुळे नवीन भाजीपाला लागवडी करपून जाण्याची समस्या

झाडांची पाने व जमिनीतून मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन

अन्न निर्मिती प्रक्रिया मंदावल्याने फूलधारणा व फळ धारणेवर परिणाम

Vegetable Farming
Vegetable Advisory : भाजीपाला सल्ला
हिरव्या मिरचीची लागवड ४ एकर क्षेत्रावर केली होती. खर्च एकरी १.५० लाख करण्यात आला होता. मात्र तापमान वाढीमुळे झाडांचे शेंडे आखडले. झाडाची वाढ थांबली आहे. परिणामी झाड अशक्त झाल्याने लागवड नावापुरती होती. यामागे इतके तापमान वाढल्याने लागवडी सोडून देण्याची वेळ आली आहे.
पंडित वाघ, भाजीपाला उत्पादक, बार्डे, ता. कलवण
टोमॅटो, मिरची, वालवड या भाजीपाला पिकांची फुलगळ मोठ्या प्रमाणावर होत आहे. पानांवरही भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. पानांना पीळ पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना म्हणतात असे झाले आहे.
सुनील भिसे, भाजीपाला उत्पादक, मोह, ता. सिन्नर
विशिष्ठ वेलवर्गीय पिकांमध्ये फुलगळ प्रमाण वाढले आहे. तीच परिस्थिती टोमॅटो, वांगी, मिरची यामध्ये फूलधारणा अवस्थेत फुलांची संख्या कमी आहे. पालेभाज्यांमध्ये वाढ व उगवण क्षमतेच्या अडचणी आहेत. सकाळी किंवा संध्याकाळी पिकांना पाणी द्यावे. झाडाच्या पानांद्वारे किंवा जमिनीतून पाण्याचे बाष्पीभवन होते. त्याचा वेग कमी करण्यासाठी बाष्परोधक फवारणी करावी.
प्रा. योगेश भगुरे, सहायक प्राध्यापक, भाजीपाला शास्त्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com