Dungmanure Shortage : बागायतदारांना शेणखताचा तुटवडा

Manure Update : सध्या सर्वत्र तंत्रज्ञान वापरून शेती केल्याने पशुधनाची संख्या दिवसागणिक कमी होत चालली आहे. त्यामुळे बागायतदारांना शेणखताचा तुटवडा जाणवत आहे.
Dungmanure Shortage
Dungmanure Shortage Agrowon

Mumbai News : जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात पारंपरिक शेती, फळबाग लागवड, फुलांच्या उत्पादनावर भर देण्यात येतो. यासाठी रासायनिक खते मोठ्या प्रमाणात वापरली जातात. सध्या सर्वत्र तंत्रज्ञान वापरून शेती केल्याने पशुधनाची संख्या दिवसागणिक कमी होत चालली आहे. त्यामुळे बागायतदारांना शेणखताचा तुटवडा जाणवत आहे.

तालुक्यातील शेतकरी शेतीचा पोत वाढविण्यासाठी शेणखताचा वापर करतात. मात्र, अलीकडच्या काळात पशुधनाची संख्या घटत असल्याने शेणखत मिळणे कठीण झाले आहे. कोणताही शेतकरी हा हमखास उत्पादन वाढविण्यासाठी खताला प्राधान्य देतो. त्यामुळे, नैसर्गिक आणि सहजपणे तयार होणाऱ्या शेणखताची मागणी वाढत आहे.

Dungmanure Shortage
Organic Farming : शेणखत आणि सेंद्रिय शेतीचं वास्तव ठाऊक आहे का?

मात्र, यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांकडील जनावरांची संख्या कमी होत आहे. मनुष्यबळाअभावी शेतकऱ्यांनी जनावरे पाळणे कमी केले आहे. जनावरांच्या किमती वाढल्याचा फटकाही शेतकऱ्यांना बसला आहे. चाऱ्याचे वाढते भाव आणि पाणीटंचाईमुळे शेतकरी पशुपालन टाळत आहेत. त्यामुळे शेणखताचा तुटवडा आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे शेणखत उपलब्ध आहे, ते स्वतःच्या शेतात टाकण्यास प्राधान्य देतात. गरज भागल्यास ते शेणखताची विक्री करतात. त्यामुळे शेतकरी शेणखताच्या शोधात आहेत. काहींनी सेंद्रिय शेती सुरू केली, त्यामुळे शेणखताची मागणी वाढली आहे. तीन ते ३,६०० हजार रुपये प्रतिट्रॅक्टर ट्रॉली दराने सध्या विक्री सुरू आहे.

Dungmanure Shortage
Agriculture Technology : गाईच्या शेणापासून बनविले ‘गोबायर’
गेल्या ४० वर्षांहून अधिक काळापासून भातशेती करत आहे. पूर्वी शेणखत सहज उपलब्ध व्हायचे, मात्र आता पैसे देऊनही व्यवस्था होत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव रासायनिक खते वापरावी लागतात.
नीलेश साळवे, बागायतदार
पशुधनाच्या शेणाचा वापर हा सरपणासाठी गौऱ्या तयार करणे, रोपाची भाजणी करणे आणि शेणखत म्हणूनदेखील वापरण्यात येते, मात्र आता शेतीतील आमूलाग्र बदलामुळे पशुधनाला उतरती कळा लागल्याने शेणखताचा तुटवडा प्रकर्षाने जाणवतो.
मीरा महाले, शेतकरी

जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत

रासायनिक खताच्या अतिवापराचे धोके लक्षात घेता राज्यात सेंद्रिय खताबाबत जनजागृती करण्यात येत आहे. दुसरीकडे पशुधनाची संख्या सातत्याने कमी होत असल्याने शेणखताचा तुटवडा भासत आहे. काही मोजके शेतकरी शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत आदींचा वापर करतात. मोठे शेतकरी प्रत्येक तीन वर्षांनी शेतात शेणखत टाकतात. काही शेतकरी जमिनीची सुपीकता वाढावी, म्हणून तळ्यातील गाळ किंवा नदीकाठची तांबडी माती आणून त्याचा वापर करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com