Sugar Rate agrowon
ताज्या बातम्या

Sugar Rate : साखरेच्या दरात होणार वाढ ? उसाला योग्य भाव मिळण्याचीही शक्यता

Sugarcane : उसाच्या उताऱ्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

sandeep Shirguppe

Sugar Rate : राज्यात पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यात आहे. दरम्यान देशासह महाराष्ट्रात सर्वाधित उत्पन्न घेतल्या जाणाऱ्या ऊस पिकावरही याचा परिणाम होताना दिसून येत आहे. जुलै महिना सोडला तर राज्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे उसाच्या उताऱ्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कमी उत्पादनामुळे यंदा साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर वगळता अनेक ठिकाणी ऊस पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान पाऊस नसल्याने ऊस पिकावर परिणाम झाला असला, तरी गाळप हंगाम वेळेत सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी कारखान्यांची थकहमी आर्थिक पुरवठा करण्याच्या तयारीत आहे. शेतकऱ्यांचा ऊस शेतात राहणार नाही. इतकेच नाही, तर उसाला योग्य भाव देण्यासाठी सरकार प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या साखरेचे दर वाढलेले आहेत यामुळे पुढच्या काही काळात साखरेचे दर असेच राहण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी एफआरपीची रक्कम बाजारातील साखरेच्या दरावर ठरत असते. जर साखरेचे भाव चढलेले राहिल्यास शेतकऱ्यांना जादा पैसे मिळण्याची शक्यात आहे. यंदा साखरेचे उत्पादन घटणार असल्याने साखरेच्या दरावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

उत्पादन घटणार

जनावरांना ऊस कापून घालण्याचे काम सुरू झाल्याने त्याचा सर्वाधिक विपरीत परिणाम आगामी साखर हंगामावर होण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबत साखर उद्योगातील तज्ज्ञांनीही असा अंदाज व्यक्त केला आहे. येत्या हंगामात राज्यातील साखरेचे उत्पादन यंदाच्या १०५ लाख टनांवरून ९० लाख टनांपर्यंत येण्याची शक्यता आहे.

२०२१-२२ मध्ये महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन १३७ लाख टन होते. यंदा ते १०५ लाख टनांवर आले. २०२३-२४ च्या हंगामात महाराष्ट्रासह कर्नाटकातील ऊस पट्ट्यात पाऊस न पडल्याने उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) ने ऑगस्ट २०२३ मध्ये महाराष्ट्रातील ऊस उत्पादनात १५ टक्क्यांनी घट होऊन १०३ लाख टनांवर जाण्याचा अंदाज वर्तवला होता. WISMA सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन नवीन अंदाज जाहीर करण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT