Malegaon Sugar Factory : अजित पवारांनी शब्द पाळला, माळेगाव साखर कारखान्याकडून राज्यात विक्रमी दर

Pune Malegaon Sugar Factory : पुणे जिल्ह्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने राज्यात ऊसाला सर्वाधिक दर देत एक नवा पायंडा पाडला आहे.
Malegaon Sugar Factory
Malegaon Sugar Factoryagrowon
Published on
Updated on

Malegaon Sahakari Sakhar Karkhana : पुणे जिल्ह्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने राज्यात ऊसाला सर्वाधिक दर देत एक नवा पायंडा पाडला आहे. एफआरपीपेक्षा जास्त दर दिल्याने माळेगाव कारखान्याची राज्यभर चर्चा होत आहे. यंदाच्या २०२२-२३ मध्ये गाळप झालेल्या ऊसाला ३ हजार ४११ रुपये दर देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती समोर आली आहे.

यासंदर्भात कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे म्हणाले की, माळेगाव कारखाना गतवर्षी गाळप केलेल्या ऊसाला किती दर देणार याकडं शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर कारखान्याने ऊसाला सर्वोच्च दर जाहीर केला.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगितल्या प्रमाणे शब्द पाळला आहे. सोमेश्वर कारखान्यापेक्षा माळेगावचा कारखाना अधिक दर देईल असे अजित पवार बारामतीच्या सभेत म्हणाले होते.

एफआरपीवर ऊस उत्पादक सभासदांना ‘एफआरपी’पेक्षा ५६१ रुपये जादा दर मिळणार आहे. तर बिगर सभासद शेतकऱ्यांना ३१०१ रुपयांप्रमाणे अंतिम ऊस बिल आदा होणार आहे. सध्या‘एफआरपी’पेक्षा जादा रक्कम देण्यात ‘माळेगाव’ राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी दिली.

Malegaon Sugar Factory
Sugar Export Ban : आता सरकार साखरेवर निर्यात बंदी घालणार? कमी पावसाचा परिणाम

यावेळी तावरे म्हणाले की, माळेगाव कारखान्याने मागच्या वर्षीच्या हंगामात १२ लाख ५० हजार ४६५ टन उसाचे गाळप केले होते. यापैकी सभासदांचा ७ लाख २६ हजार, तर गेटकेनधारकांचे ५ लाख ३३ हजार टन उसाचे गाळप झाले आहे.

११.८१ टक्के उताऱ्यानुसार १३ लाख २८ हजार ९०० क्विंटल साखर निर्मिती झाली. तर सहविजनिर्मितीतून ५ कोटी ४९ लाखा ७० हजार युनिटची वीज विक्री झाली आहे. डिस्टलरीतून २ कोटी १७ लाख ८० हजार लिटर अल्कोहोल व १ कोटी ८३ लाख ४२ हजार लिटर इथेनॉल निर्मिती केली.

माळेगाव कारखान्याची एफआरपी २८५१ प्रतिटन इतकी असून, आतापर्यंत सभासदांना एफआरपी व १०० रुपये जादा असे २९५१ रुपये दिले आहेत. आता उर्वरित प्रतिटन ४६० रुपये इतकी रक्कम आगामी काळात सभासदांना मिळणार आहे. तर गेटकेनधारकांना याअगोदर दिलेली २८५१ रुपये वगळता उर्वरित २४९ रुपये मिळणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com