Wild Life Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Wild Life Crop Damage : वन्यजीव नुकसान भरपाईत वाढ करणार : मुनगंटीवार

राज्यात वन्य प्राण्यांमार्फत होणाऱ्या नुकसानीसाठी देण्यात येणारी नुकसानभरपाईची रक्कम अल्प आहे.

Team Agrowon

Kolhapur News कोल्हापूर ः ‘‘राज्यात वन्य प्राण्यांमार्फत होणाऱ्या नुकसानीसाठी (Crop Damage) देण्यात येणारी नुकसानभरपाईची (Compensation) रक्कम अल्प आहे. यात वाढ करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून राधानगरी विधानसभा मतदार संघातील वन्यप्राण्यांच्या उपद्रवासंदर्भात मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृहात ही बैठक झाली. त्या वेळी मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.

मुनगंटीवार म्हणाले, ‘‘वन्यजीव मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे. वन्यजीवांकडून शेती, घरांचे नुकसान होते. सध्‍या शासनाकडून देण्यात येणारी भरपाई कमी आहे. त्यामुळे लोकांची आर्थिक कोंडी होते. यामुळे भरपाईत वाढ करणार आहोत.

आमदारांच्या मागणीनुसार वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे दवाखान्यामध्ये उपचार घेत असणाऱ्या जखमी व्यक्ती व मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीतही वाढ करणार आहे.’’

वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वन संरक्षक (प्रादेशिक) आर. के. राव, वन्यजीव संरक्षक महिम गुप्ता, प्रवीण चव्हाण, संचालक (ताडोबा) जितेंद्र रामगावकर, क्षेत्रसंचालक ना. सी. लडकत, मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर, गोविंद पिळणकर, रमेश पाटील, अरुण देवाळे, संतोष मेंगाणे, संदीप देसाई आदी या वेळी उपस्थित होते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Crisis: सणासुदीला अस्मानीचे संकट कायम

Farmer Aid: अतिवृष्टी अनुदानाचे २५३ कोटी रुपये पोर्टलवर अपलोड

Farmers Support: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे राहायला हवे

Farmers Protest: राज्य सरकारच्या निषेधार्थ परभणीत आंदोलने

Dams Status: आवक घटल्याने प्रकल्पांची पाणीपातळी स्थिर

SCROLL FOR NEXT