Shinde & Fadanavis
Shinde & Fadanavis Agrowon
ताज्या बातम्या

Ekanath Shinde : आषाढी एकादशीनंतर मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा करू: शिंदे

Team Agrowon

सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे दिल्लीत दाखल झाले, या दौऱ्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्यांनतर आयोजित पत्रकारपरिषदेत शिंदे आणि फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आषाढी एकादशीनंतर मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करणार असल्याचे सांगितले. ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) निवडणुका होऊ नयेत, अशीच आपली मनीषा आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाशी चर्चा सुरु असल्याचेही शिंदे म्हणाले.

राज्याच्या विकासासाठी आम्ही दिल्लीत काही सदिच्छा भेट घेतल्या आहेत, असे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. मी आणि देवेंद्र फडणवीस दोघे उद्या आषाढी एकादशी झाली की मुंबईत बसून चर्चा करू आणि तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर देऊ असे त्यांनी सांगितले. अधिवेशन हे पुढे ढकलले जाणार का? यावर बोलताना शिंदे यांनी , १८ तारखेला राष्ट्रपतीपदाची निवडणूक असल्याने अधिवेशनाच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले. पण या अधिवेशनाच्या पुर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे आवर्जून सांगितले.

शिवसेना-भाजप युतीचे (Shivsena-BJP Alliance)सरकार जे अडीच वर्षींपूर्वी यायला पाहीजे होते, ते आम्ही स्थापन केले आहे, चाळीस अधिक दहा हे ५० आमदार तीन-चार लाख लोकातून निवडून आलेले आमदार आहेत, ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक देखील इकडे तीकडे जायला दहा वेळा विचार करतो, या आमदारांना मागच्या अडिच वर्षात त्यांना अनुभव आला आहे.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता. हे आमचे बंड नाही, ही गद्दारी नाही, ही क्रांती आहे, अन्यायाविरोधातील उठाव आहे, हे पैशांने विकले जाणारे नाहीत, अशा शब्दांत शिंदे यांनी शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर दिले.

आम्हीच शिवसेना (Shivsena)आहोत, आम्हाला विधानसभा अध्यक्षांनी (Assembly Speaker) मंजुरी दिली आहे, आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. ज्या ज्या वेळी गरज असलं त्या त्यावेळी खरी शिवसेना कोण आहे ते स्पष्ट होईल. सध्या काही जणांकडून हेतुपूर्वक दिशाभूल करणारी वक्तव्ये करण्यात येत आहेत, असे काही घडणार नाही. हे सरकार अडीच वर्ष पुर्ण करेलच एवढी कामे आम्ही करू, बाकी लोकांसारखे २५ वर्ष वगैरे सांगत नाही. पण पुढची निवडणूक पण जिंकू आणि २०० आमदार निवडून आणू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी व्यक्त केला.

शिंदे हेच आमचे नेते

मुख्यमंत्रीपदाऐवजी उपमुख्यमंत्री का स्वीकारले? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पक्षाचा आदेश आपल्यासाठी सर्वोच्च असल्याचे सांगितले. पक्षानेच मला पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदी संधी दिली. पक्षामुळेच मी मोठा झालो, त्यामुळे ज्यावेळी पक्षाची गरज असेल त्यावेळी पक्षाचा आदेश पाळणे माझे कर्तव्य आहे. बाळासाहेबांचा (Balasaheb Thackeray) वारसा चालवणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, शिंदे हेच आमचे नेते असून आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचेही फडणवीस म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT