Maharashtra Political Crisis: धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊन शकत नाही : ठाकरे

लोकांवरील दडपण कमी करण्याचे काम मी करतो आहे. शिवसैनिकांवर दडपण वाढेल, असे मी बोलणार नाही. पण कालच्या भेटीगाठीतील चर्चेतून शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा सुरु आहे. कायद्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेकडून (Shiv Sena) कोणीही हिरावून घेत नाही. त्यामुळे चिन्हाबाबतची चिंता सोडा. लोक धनुष्यबाणच नव्हे तर उमेदवारही पाहतात.
Bow And Arrow
Bow And ArrowAgrowon

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) चिन्ह धनुष्यबाण हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे याबद्दल शिवसैनिकांनी मनात कोणताही संभ्रम बाळगू नये, असे आवाहन आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. याबाबत आपण घटनातज्ज्ञांशी चर्चा केली असल्याचेही ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचे (Shiv Sena) चिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थकांकडे जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. बंडखोर आमदारांकडूनही असा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषद घेतली.

Bow And Arrow
Maharashtra Crisis: एकनाथराव, काहीतरी काळेबेरे आहे सावध रहा

ठाकरे म्हणाले, "कालपासून मी अनेक शिवसैनिकांशी संवाद साधतो आहे. सगळ्यांच्या भावना दाटून आल्या आहेत. लोकांवरील दडपण कमी करण्याचे काम मी करतो आहे. शिवसैनिकांवर दडपण वाढेल, असे मी बोलणार नाही. पण कालच्या भेटीगाठीतील चर्चेतून शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा सुरु आहे. कायद्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेकडून (Shiv Sena) कोणीही हिरावून घेत नाही. त्यामुळे चिन्हाबाबतची चिंता सोडा. लोक धनुष्यबाणच नव्हे तर उमेदवारही पाहतात.

Bow And Arrow
Narendra Modi: किसान संघाचा मोदी सरकारला घरचा अहेर

काल मी शिवसैनिकांना गेल्या काळात काय काय घडले ते सांगत होतो, याचा अर्थ आमचे चिन्ह जाणार आहे असा होत नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. सध्या अशी चर्चा आहे की, एवढे नगरसेवक गेले तेवढे नगरसेवक गेले, त्याला काही अर्थ नाही. कारण सध्या महापालिका अस्तित्वात नाहीत. त्यामुळे ते त्यांचे व्यक्तिगत कार्यकर्ते असतील. ज्यांना आम्ही निष्ठावंत म्हणून उमेदवारी दिली होती, ते गेले असतील. शिवसेना भवनात साधेसाधे शिवसैनिक येत होते.

कालपरवापर्यंत शिवसेनाभवनात राज्यातील शिवसैनिक महिला आल्या होत्या. तळहातावर पोट असणारे साधे लोक येत आहेत आणि रडत आहेत. शिवसेनेने ज्यांना मोठे केले ते निघून गेले. पण अशी साधी माणसं जोपर्यंत सोबत आहेत तोपर्यंत शिवसेनेच्या (Shiv Sena) भवितव्याला कोणीही धोका पोहोचू शकत नसल्याचा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

Bow And Arrow
Dairy Development: राष्ट्रीय डेअरी योजनेत दूध भेसळ रोखण्यावर भर

विधीमंडळ पक्ष आणि नोंदणीकृत पक्ष वेगळा असतो - ठाकरे

विधीमंडळ पक्ष हा वेगळा असतो आणि नोंदणीकृत पक्ष वेगळा असतो. कारण पक्षातून आमदार गेले तरी पक्ष टिकून राहतो. शिवसेना पळवून नेण्याची गोष्ट नाही. नोंदणीकृत पक्षात असंख्य लोक असतात. त्यामुळे धनुष्यबाण या चिन्हाबद्दल कोणताही संभ्रम मनात ठेवू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

Bow And Arrow
Free Electricity: पंजाबात ३०० नव्हे,६०० युनिट्स मोफत वीज

तेव्हा दातखिळ बसली होती का?

बंडखोरीबाबत मलाही वाईट वाटत आहे. मला कुठेही वाद विवाद होऊ द्यायचा नाही. आता आमच्याबद्दल प्रेम, आदर व्यक्त करणारे आमच्यावर विकृत टीका करणाऱ्यांवर बोलताना का गप्प होते? तेंव्हा दातखिळ बसली होती का? असा सवाल उपस्थित करत उध्दव ठाकरे यांनी बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com