State Elections Commission : ओबीसी आरक्षणाशिवाय होणार ९२ नगरपालिका, ४ नगरपंचायतीच्या निवडणुका

या निवडणूकीची प्रक्रिया २० जुलैपासून सुरु होणार असून १८ ऑगस्ट रोजी मतदान (Voting) होणार आहे. तर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल (Election Result) जाहीर केले जाणार आहेत.
Local Self Government
Local Self GovernmentAgrowon

(वृत्तसंस्था)

राज्यातील कमी पाऊस असलेल्या १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने (State Elections Commission) आज जाहीर केला. या निवडणूकीची प्रक्रिया २० जुलैपासून सुरु होणार असून १८ ऑगस्ट रोजी मतदान (Voting) होणार आहे. तर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल (Election Result) जाहीर केले जाणार आहेत.

Local Self Government
Maharashtra Crisis: एकनाथराव, काहीतरी काळेबेरे आहे सावध रहा

निवडणूक आयोगाने (State Elections Commission) दिलेल्या निर्देशानुसार २० जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून लगेच २२ ते २८ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी २९ जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे. ४ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

Local Self Government
Suresh Prabhu: भाजपकडून उपराष्ट्रपतीपदासाठी सुरेश प्रभू?

जिथे गरज भासेल तिथे १८ ऑगस्ट रोजी मतदान घेतले जाणार आहे. मतदानानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहीर केले जाणार असल्याचेही निवडणूक आयोगाने (State Elections Commission) स्पष्ट केले.

Local Self Government
Maharashtra Political Crisis: धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊन शकत नाही : ठाकरे

उमेदवारी अर्ज मागे घेणे आणि प्रत्यक्ष मतदान यात १४ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. प्रचारासाठी उमेदवारांना दोन आठवड्यांचा कालावधी मिळणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम मतदार याद्यांची निश्चिती झालेली असून त्या मतदार याद्यानुसारच मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. दरम्यान राज्यातील सत्ता बदलानंतर नगराध्यक्ष जनतेतून निवडावा अशी भाजपची (BJP) भूमिका असल्याने राज्य शासन त्या बाबत काय निर्णय घेणार या बाबतही उत्सुकता होती.

मात्र आता निवडणूक आयोगाने (State Elections Commission) प्रत्यक्ष निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केल्याने नगरपालिकांच्या निवडणकांचा बिगुल वाजला आहे. यंदा प्रथमच संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबचा उल्लेख निवडणूक आयोगाने केलेला असल्याने ती एक नवीन बाब ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com