Rain Agrowon
ताज्या बातम्या

Vidarbha Rain Update : पश्‍चिम विदर्भात सर्वदूर रिमझिम पाऊस

Vidarbha Latest Rain News : गेल्या काही दिवसांपासून पाऊस न झाल्याने चिंता वाढल्या होत्या. अखेरीस मागील २४ तासांपासून पावसाचा जोर कमी असला तरी सर्वदूर हा रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे.

Team Agrowon

Akola Monsoon News : गेल्या काही दिवसांपासून पाऊस न झाल्याने चिंता वाढल्या होत्या. अखेरीस मागील २४ तासांपासून पावसाचा जोर कमी असला तरी सर्वदूर हा रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे.

त्यातही काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यात प्रामुख्याने वाशीम जिल्ह्यातील कारंजामध्ये सर्वाधिक ४८.७, तर बुलडाण्यातील मलकापूरमध्ये ४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जुलैचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी सार्वत्रिक पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबलेल्या होत्या. अखेरीस गेल्या २४ तासांत पाऊस दाखल झाला. सध्या अकोला, वाशीम, बुलडाणा या तीनही जिल्ह्यांतील विविध तालुक्यांत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. या पावसामुळे झालेल्या पेरण्यांना फायदा होईल. शिवाय रखडलेल्या पेरण्यांनाही दिलासा मिळू शकणार आहे.

तालुकानिहाय झालेला पाऊस

कारंजा ४८.७, मलकापूर ४६, बार्शीटाकळी ३८.४, अकोट १५, तेल्हारा १६.५, बाळापूर २३.५, पातूर ११.४, अकोला ३४.६, मूर्तिजापूर २६.७, शेगाव २८.७, मोताळा १४.२, नांदुरा १४.४, बुलडाणा १२, संग्रामपूर १२.२, मंगरूळपीर २१.८, मानोरा १५.४, मालेगाव १०.७. मिलिमीटर एवढा पाऊस आत्तापर्यंत झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seafood Export: अमेरिकेच्या आयातशुल्क वाढीचा कोळंबी निर्यातीवर परिणाम, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंची माहिती

FSSAI Registration: दूध उत्पादक-विक्रेत्यांना एफएसएसएआय नोंदणी सक्तीची

Unseasonal Rain: माकणी परिसरात पाऊस, गारपीट

Krishi Kumbh Exhibition: ‘कृषिकुंभ’कडे मंत्री, लोकप्रतिनिधींची पाठ

Unseasonal Rain Damage: ‘अवकाळी’ने रब्बी पिकांसह फळबागांना फटका

SCROLL FOR NEXT