Pune APMC | APMC Election Agrowon
ताज्या बातम्या

Pune APMC : सभापतिपदी वर्णी कोणाची लागणार?

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाच्या हालचालींना वेग आला आहे. आशिया खंडात दोन नंबर समजल्या जाणाऱ्या बाजार समितीचा सभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले.

Team Agrowon

प्रवीण डोके

Pune APMC News कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाच्या हालचालींना वेग आला आहे. आशिया खंडात दोन नंबर समजल्या जाणाऱ्या बाजार समितीचा सभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. सभापती निवड (ता. ९) मंगळवारी होणार आहे. दिलीप काळभोर, प्रकाश जगताप आणि रोहिदास उंद्रे यांची नावे चर्चेत आहेत. परंतु दिलीप काळभोर यांचे नाव जवळपास निश्‍चित झाले असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तब्बल वीस वर्षांनी झाली आहे. त्यामुळे सभापतिपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी मोठी आहे. पाच वर्षांत सभापतिपद प्रत्येकी एक-एक वर्ष दिले जाणार आहे.

तरीही वीस वर्षांनंतर पहिल्यांदा सभापतिपदी वर्णी कोणाची लागणार याची उत्सुकता सर्वांना आहे. शेवटच्या एका वर्षात निवडून आलेल्या आणि अभ्यासाच्या जोरावर चांगली कामगिरी केलेल्या संचालकाला सभापतिपद दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दिलीप काळभोर, प्रकाश जगताप, रोहिदास उंद्रे हे सेवा सहकारी संस्था मतदार संघातून सर्वसाधारण गटातून विजयी झाले आहेत. बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास आघाडीने १८ पैकी १३ जागा मिळवत विजय मिळवला आहे.

दिलीप काळभोर ः हे सहकारातील ज्येष्ठ नेते अशोक काळभोर यांचे भाऊ आहेत. हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती, यशवंत सहकारी साखर कारखाना आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या सहकारातील तिन्ही महत्त्वाच्या संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

प्रकाश जगताप ः यांनी यापूर्वी बाजार समितीचे सभापती म्हणून काम केले आहे त्यांचे बंधू सुभाष जगताप यांनी हवेली पंचायत समितीचे सदस्य, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम केले आहे, तर सुभाष जगताप यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या.

सभापती निवडीनंतरची आव्हाने

- फुलबाजाराचे अर्धवट असलेले काम पूर्ण करणे

- भुसार बाजारातील एफएसआय वाढवून आणणे

- व्यवसायाला जागा अपुरी पडत असल्याने नवीन जागा शोधणे

- शिवनेरी, नेहरू रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी

- उपबजारांचा विकास करणे

- पार्किंगसाठी उपाययोजना करणे गरजेचे

- कचरा आणि दुर्गंधीसाठी उपाययोजना करणे

अनिरुद्ध (बापू) भोसले २७ व्या वर्षी संचालक

श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अनिरुद्ध (बापू) भोसले वयाच्या २७ व्या बार्शी बाजार समिती संचालक मंडळामध्ये निवडून आले आहेत. ते सध्या सर्वांत तरुण उमेदवार आहेत. एवढ्या कमी वयामध्ये संचालक म्हणून निवडून येणारे ते पहिलेच उमेदवार आहेत.

बरेच जण इच्छुक आहेत. सभापती कोणाला करायचे याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल. सभापतिपद नगर रस्ता परिसरातील उमेदवाराला मिळाले तर उपसभापतिपद हे सोलापूर रस्ता परिसरात दिले जाणार आहे. तर सोलापूर रस्ता परिसरात सभापतिपद मिळाल्यास नगर रस्ता परिसरात उपसभापतिपद मिळणार आहे.
- विकास दांगट, पॅनेल प्रमुख, अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळदीच्या दरावरील दबाव कायम, गवारला उठाव कायम, शेवगा महागले; काकडी आवक वाढली, लसूणचे भाव स्थिर

Maharashtra Heavy Rain: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार

Water Storage : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ प्रकल्प पूर्ण भरले

Soybean MSP : सांगली जिल्ह्यात सोयाबीनला हमीभाव केवळ कागदावरच

Electricity Production : जळगावात होणार ६८२ मेगावॉट अतिरिक्त वीजनिर्मिती

SCROLL FOR NEXT