Pune APMC Election : पुणे बाजार समितीच्या किल्ल्‍या भाजप पुरस्कृत ‘राष्‍ट्रवादी’च्या ताब्यात

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तब्बल २० वर्षांनी झालेल्या निवडणुकीत, समितीच्या तिजोरीच्या किल्ल्या भाजप पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेल्या आहेत.
Pune APMC Election
Pune APMC ElectionAgrowon
Published on
Updated on

Pune APMC Election पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Pune APMC) तब्बल २० वर्षांनी झालेल्या निवडणुकीत, समितीच्या तिजोरीच्या किल्ल्या भाजप (BJP) पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ताब्यात गेल्या आहेत. यामुळे वर्षांनुवर्षे राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखाली असलेल्या बाजार समितीवर भाजप सत्ता गाजविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

१८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तब्बल १३ जागांवर भाजप पुरस्कृत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत.

यामुळे आता सभापतिपदाची माळ पूर्वाश्रमीच्या राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या माजी सभापती काळभोर किंवा भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रोहिदास उंद्रे यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल आणि भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलने एकमेकांसमोर शड्डू ठोकला होते.

राष्ट्रवादी पॅनेलचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले, तर भाजप पुरस्कृत पॅनेलचे नेतृत्व जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट आणि भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे यांनी केले होते.

Pune APMC Election
Nashik Apmc Election Update : नाशिक जिल्ह्यात प्रचार शिगेला पोहोचला

मतमोजणीचा पहिला निकाल हमाल मापाडी मतदार संघाचा जाहीर झाला आहे. या निकालात संतोष नांगरे यांनी विजयाची शिट्टी वाजवली. नांगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यांना सर्वाधिक ८८८ मते मिळाली. त्यांनी हमाल मापाडी महामंडळाचे ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांनी जाहीर केलेल्या राजेंद्र चोरघे यांचा पराभव केला. चोरघे यांना ४०३, तर त्या खालोखाल गोरख मेंगडे यांना ३१४ मते मिळाली.

ग्रामपंचायत मतदार संघात दोन्ही पॅनेलला प्रत्येकी दोन जागा

ग्रामपंचायत मतदार संघात चार जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे २ आणि अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सर्वपक्षीय पॅनेलचे २ उमेदवार विजयी झाले आहेत. अत्यंत चुरशीने मतदान झाल्यामुळे समसमान जागांवर विजय मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातील दोन्ही निकाल जाहीर झाले असून, विजयी उमेदवारांनमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रामकृष्ण सातव (वाघोली) हे सर्वाधिक ४०५ मते घेऊन विजयी झाले आहेत.

तर, अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सुदर्शन चौधरी (सोरतापवाडी) २५६ मते घेऊन विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघात अनुसूचित जाती जमाती मतदार संघातील एका जागेसाठी ३ उमेदवार रिंगणात होते.

त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे नानासाहेब आबनावे (चंदननगर खराडी) हे ३०७ मतांनी विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघात शेतकरी विकास आघाडीचे रवींद्र कंद (लोणीकंद) ३७५ मते घेऊन विजयी झाले आहेत.

Pune APMC Election
Pune APMC Election : पुणे बाजार समितीसाठी ६७.८२ टक्के मतदान

सेवा सहकारी सोसायटी गटावर भाजप पुरस्कृत आघाडीचे वर्चस्व

सेवा सहकारी सोसायटी गटावर भाजप पुरस्कृत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे वर्चस्व राहिले असून, विकास सोसायटीच्या ११ पैकी ११ जागांवर आणि ग्रामपंचायत मतदार संघात चार पैकी दोन जागांवर अशा एकूण पंधरा जागांपैकी १३ जागांवर विजय मिळवला आहे.

भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि पुणे बाजार समितीचे माजी सभापती रोहीदास उंद्रे यांना सेवा सोसायटी मतदार संघातून सर्वाधिक १ हजार ३२ मते मिळाली आहेत.

माजी सभापती दिलीप काळभोर यांना ८०५, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रशांत काळभोर यांना ८८०, माजी संचालक राजाराम कांचन ८५४, माजी सभापती प्रकाश जगताप ९३९ , नितीन दांगट १,०१९ , दत्तात्रेय पायगुडे ८३० हे सर्वसाधारण गटातून विजयी झाले आहे.

तर, इतर मागास प्रवर्गातील शशिकांत गायकवाड ८६० मतांनी विजयी झाले आहेत. भटक्या जाती विमुक्त जमाती गटातून लक्ष्मण केसकर ८७९ मते घेत विजयी झाले आहेत.

महिला राखीव मतदार संघातून मनीषा हरपळे १,०७६ मते मिळवून विजयी झाल्या आहेत. तर सारिका हारगुडे ८६८ एवढ्या मतांनी निवडून आल्या आहेत. हरगुडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि पुणे मनपाचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्या पत्नी सरला चांदेरे यांचा पराभव केला आहे.

Pune APMC Election
APMC Election Maharashtra : बाजार समितींच्या कारभाराच्या चाव्या कोणाकडे राहणार? आज निकाल

अडते-व्यापारी गटात घुले-भोसले विक्रमी मतांनी विजयी

अडते व्यापारी मतदार संघातील दोन जागांवर जय शारदा गजानन पॅनेलचे गणेश घुले आणि अनिरुद्ध भोसले विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. गणेश घुले यांना ५ हजार ८५२ मते, तर अनिरुद्ध भोसले यांना ५ हजार ८१६ मते मिळाली.

या गटातील उमेदवार, ज्येष्ठ अडते आणि माजी संचालक विलास भुजबळ (६५० मते), अमोल घुले (३७४ मते), सौरभ कुंजीर (१ हजार ६५० मते), शिवाजी सूर्यवंशी (१ हजार २७०) मते मिळाल्याने यांचा मानहानीकारक पराभव झाला.

विकास दांगट, प्रदीप कंद विजयाचे शिल्पकार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराजांची मोट भाजप बांधण्यात यशस्वी झाला. ही मोट बांधण्यासाठी जिल्हा बॅंकेचे विद्यमान संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विकास दांगट आणि जिल्हा परिषद व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी रणनीती अवलंबिली होती.

या रणनीतीत माजी सभापती दिलीप काळभोर, प्रकाश जगताप यांचा अनुभव कामी आला. दरम्यान, विकास दांगट यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षातून जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांची पक्षातून नुकतीच हकालपट्टी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com