Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : परतीचा माॅन्सून कुठे अडकला?

राज्यात आज काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक मंडळांमध्ये पावसाचा जोर अधिक होता.

Team Agrowon

पुणेः राज्यात आज काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक मंडळांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. माॅन्सूनचा परतीचा प्रवास आजही जैसे थेच होता. तर हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. माॅन्सूनच्या परतीचा प्रवास आजही थांबला होता. माॅन्सूनच्या परतीची सीमा कैलाशहर, बेरहामपूर, कानके, विलासपूर, ब्रम्हपुरी, बुलडाणा, डहाणून या भागात कायम आहे. पुढील २४ तासांमध्ये माॅन्सून विदर्भ, छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा आणि संपूर्ण पश्चिम बंगालच्या काही भागातून माॅन्सून परतण्यास पुरक स्थिती निर्माण होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे.

राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, नाशिक आणि नगर जिल्ह्यात  काही ठिकाणी जोरदार सरी पडल्या. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक होता. तर नाशिक जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये जोरदार पाऊस पडला. जळगाव आणि धुळे जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली.

मराठवाड्यातही अनेक ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. तर नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा मंडळात आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जौती मंडळात प्रत्यकी ५० मिलिमीटर पाऊस पडला. तसचं अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, वाशीम, अकोला या जिल्ह्यांमध्ये काही मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या.

हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर आणि नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी वीजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CSR Funding Issue: सीएसआर निधी खर्चातील विसंगती

Festival Noise Pollution: गोंगाटात हरवलेला उत्सव

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

SCROLL FOR NEXT