Crop Advisory : सोयाबीन, कापूस, तूर पिकाची काळजी कशी घ्याल?

काढणीच्या अवस्थेत असलेल्या सर्व पिकांमध्ये मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बऱ्याच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Soybean, Cotton, Tur
Soybean, Cotton, TurAgrowon

काढणीच्या अवस्थेत असलेल्या सर्व पिकांमध्ये मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे (heavy rain)बऱ्याच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडला. त्यामुळे सर्वप्रथम शेतातील साचलेले पाणी शेताबाहेर काढावे. काढणीच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन (Soybean), कापूस (Cotton) आणि तूर (Tur) पिकातील व्यवस्थापनाविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

सोयाबीन

सोयाबीनच्या जे एस ९५ - ६०, जे एस २० - ३४, जे एस ९३ - ०५, एनआरसी १३० या लवकर पक्व होणाऱ्या जाती परीपक्वतेच्या अवस्थेत असल्याने स्वच्छ हवामान पाहून पिकाची वेळेवर कापणी करावी. कापणी केलेले सोयाबीन  ताबडतोब उन्हात वाळवावे व त्याची मळणी करावी. उशिरा पक्व होणाऱ्या सोयाबीनच्या शेंगाच्या रंगातील बदलानुसार पिकाची कापणी करावी. परिपक्वतेच्या वेळी पावसामुळे शेंगातील दाणे फुटल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि दर्जेदार उत्पादन मिळण्यासाठी कापणी केलेले पीक योग्य प्रकारे वाळवावे. पुढील हंगामात बियाण्यासाठी सोयाबीनचा वापर करायचा असेल तर, बियाणे उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळण्यासाठी १३ ते १५ टक्के बियाण्यातील आर्द्रता आणि ३५० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर सोयाबीनची मळणी करावी. साठवणुकीसाठी सोयाबीन बियाण्यातील आर्द्रता १२ टक्के पेक्षा जास्त नसावी. 

कापूस

कापूस पीक सध्या बोंड धरण्याच्या अवस्थेत आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील पानावरील ठिपके आणि बुरशीजन्य बोंड सड रोगाच्या  व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू पी) १० ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५  इसी) १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फुल अवस्थेतील कपाशी पिकावर २ टक्के युरिया ची फवारणी करावी. चांगल्या उत्पादकतेसाठी फुलांच्या वाढीच्या अवस्थेत २ टक्के डीएपी ची फवारणी करावी. पातेगळ व फुलगळ नियंत्रित करण्यासाठी ५ मिली प्लॅनोफिक्स प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तूर पिक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. सततच्या पावसाळी व ढगाळ हवामानामुळे तुरीमध्ये आढळलेल्या फायटोप्थेरा ब्लाईट, स्टेम रॉट किंवा स्टेम ब्लाईटच्या नियंत्रणासाठी फॉसेटील एएल (८० टक्के डब्ल्यू पी) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मुळकुज रोगाची लक्षणे दिसताच नियंत्रणासाठी कॉपरऑक्सिक्‍लोराईड (५० % डब्ल्यूपी) प्रति २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या मुळाशी आळवणी करावी. फवारणी स्वच्छ वातावरणात करावी. 

तूर 

तुरीवर केसाळ अळी किंवा पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी चार ते पाच फेरोमन सापळे लावावेत आणि वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावे. पाने खाणाऱ्या अळीच्या  नियंत्रणासाठी शेतात पक्षी थांबे लावावेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com