Wast Water Management
Wast Water Management Agrowon
ताज्या बातम्या

West Water Management : कळंबासह तीन गावांत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प

टीम ॲग्रोवन

कोल्‍हापूर : पंचगंगा नदी (Panchganga River) काठच्या उचगाव, तसेच कळंबा-पाचगाव गावांचा सांडपाणी व्यवस्‍थापनाचा प्रकल्‍प (West Water Management Project) अहवाल केआयटी कॉलेज व शिवाजी विद्यापीठाने तयार केला आहे. त्यात किरकोळ त्रुटी आहेत. त्या दूर केल्यानंतर त्याचे सादरीकरण होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या बैठकीत मंगळवारी (ता. ३०) देण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्‍हाण यांच्या उपस्‍थितीत बैठक झाली. बैठकीस जल जीवन मिशन प्रकल्‍प संचालक प्रियदर्शनी मोरे, कार्यकारी अभियंता अशोक धोंगे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव व पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, संबंधित संस्‍थांचे प्रतिनिधी उपस्‍थित होते.

केआयटी कॉलेजने उचगावचा प्रकल्‍प अहवाल तयार केला आहे. प्रकल्‍पाची किंमत १५ कोटी आहे. उचगाव येथे जमा होणाऱ्‍या सांडपाण्याचा विचार करून हा प्रकल्‍प तयार केला आहे. अहवाल महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्याकडे पाठविला आहे. शिवाजी विद्यापीठाने कळंबा, पाचगावचा आराखडा तयार केला आहे. मात्र, त्यांनी एकूण सांडपाणी व घनकचरा विचारात घेऊन अहवाल सादर केलेला नाही. प्रति एमएलडी अडीच कोटी रुपये खर्च गृहीत धरून प्रकल्‍प अहवाल सादर केला आहे; मात्र एकूण जमा होणारे सांडपाणी विचारात घेऊन प्रकल्‍प अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, जैववैद्यकीय कचरा व्यवस्‍थापन प्रकल्‍पास लागणारी जागा मिळवण्यासाठी जिल्‍हा आरोग्य अधिकाऱ्‍यांनी जिल्‍हाधिकाऱ्‍यांना प्रस्‍ताव द्यावा, तसेच सांडपाणी घनकचरा व्यवस्‍थापन प्रकल्‍पासाठी सीएसआरमधून निधी घेण्यावरही चर्चा करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT