Nilwande Canal Agrowon
ताज्या बातम्या

Nilwande Canal : निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडणार

Agriculture Irrigation : निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातील कामांच्या त्रुटी दुरुस्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

Team Agrowon

Nagar News : निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातील कामांच्या त्रुटी दुरुस्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण होताच पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

या बाबत मागील आठवड्यात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्र्यांनी बैठक घेतली. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनाही निळवंडेतून पाणी सोडण्याची मागणी केली होती.

निळवंडे धरण कार्यक्षेत्रात यंदा पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे निळवंडे धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी होती. श्री. थोरात यांनाही त्याबाबत मागणी केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही पाणी मिळत नसल्याबाबत कैफियत मांडली.

त्यामुळे धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मागील आठवड्यात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

दोन दिवसांपूर्वी पुन्हा आढावा घेतल्यानंतर उर्वरित काम अंतिम टप्प्यात असल्याचे अधिकाऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. काम पूर्ण होताच कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन निश्‍चित करण्यात आले असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.‌

प्रकल्पाचा डावा कालवा अकोले तालुक्यातील भाग प्रामुख्याने डोंगराळ असल्यामुळे काही लांबीत एका बाजूला डोंगर व कठीण खडकातील खोदाई व दुसऱ्या बाजूला १४-१५ मी. उंचीचे माती भराव काम करून कालव्याचे काम करण्यात आले.

त्यामुळे कालवा खोदकाम करताना कालव्याच्या तळातील खडकास तडे गेले. त्यामुळे अकोले तालुक्यातील नीळ, म्हाळादेवी, मेहदुरी व कळसच्या भागामध्ये पाणी गळती होत होते. याच कारणामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. ही बाब प्राधान्याने विचारात घेण्यात आली आहे.

गळती रोखण्यास प्राधान्य

खडकाच्या भागामध्ये कालव्याच्या तळात आणखी खोदाई करून त्यात काळी माती भरणे, मोठ्या भरावाच्या ठिकाणी रिटेनिंग वॉल करणे अशा प्रकारच्या गळती प्रतिबंधक उपाययोजनेची कामे गतीने पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यानंतर पाणी सोडण्यात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Skill Development: प्रशिक्षण द्या, कारागीर वाढवा; पैठणी कारागिरांनी मांडल्या अडचणी

Banana Crop Protection: केळीमधील चिलिंग इन्जुरी टाळण्यासाठी उपाय

Maize Procurement: मका खरेदी केंद्राअभावी कर्नाटकातील शेतकऱ्यांना फटका, व्यापाऱ्यांकडून भाव पाडून खरेदी, क्विंटलमागे ८०० रुपयांचे नुकसान

Agricultural Land Act: हैदराबाद कूळ वहिवाट आणि शेत जमीन अधिनियम

Maharashtra Politics: पुढच्यास ठेच मागचा शहाणा

SCROLL FOR NEXT