Nilwande Dam : ‘निळवंडे’ सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित

Water Supply Canal : निळवंडे धरण व कालवे व्हावेत, हे आपले स्वप्न होते. त्यासाठी १९८५ पासून सुरू केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित म्हणजे उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणासह कालव्यांचे काम आहे.
MLA Balasaheb Thorat
MLA Balasaheb ThoratAgrowon

Nagar News : निळवंडे धरण व कालवे व्हावेत, हे आपले स्वप्न होते. त्यासाठी १९८५ पासून सुरू केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित म्हणजे उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणासह कालव्यांचे काम आहे.

अथक परिश्रमातून साकारलेल्या कालव्यातून संगमनेर तालुक्यात आलेले पाणी हा जीवनातील आनंदाचा क्षण असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat) यांनी केले. सहा महिन्यांपूर्वीच कालव्याचे काम झाले होते. पाणी सोडण्याच्या चाचणीसाठी मी पूर्वीच पाठपुरावा केला होता, असे ते म्हणाले.

संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा येथील बोगद्यालगत डाव्या कालव्यात बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. त्यानंतर बोलताना थोरात म्हणाले, की १९९२ मध्ये धरणाच्या कामास प्रारंभ झाला.

मात्र त्यास १९९९ पासून खऱ्या अर्थाने गती मिळाली. कामासाठी निधी, पुनर्वसन आदी विविध अडथळ्यांच्या शर्यतीवर मात करीत धरणाचे काम पूर्णत्वास नेण्यात यश आले. अनेक अडचणींवर मात करून धरण पूर्ण केले. मात्र आपण कधीही श्रेयासाठी काम केले नाही.

MLA Balasaheb Thorat
MLA Balasaheb Thorat : मागणीनंतर तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्या : थोरात

अनेकांच्या त्यागातून, सहकार्यातून हा सोन्याचा दिवस उगवला आहे. डाव्या कालव्याचे काम सहा महिन्यांपूर्वी झाले होते. धरणात पाणी शिल्लक असताना चाचणी व्हावी, यासाठी आपण पाठपुरावा केला.

या वेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, ॲड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, मिलिंद कानवडे, संतोष हासे, विश्‍वास मुर्तडक, उत्तमराव घोरपडे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, उपस्थित होते.

सवाद्य मिरवणूक

बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातूनच निळवंडे धरणाचे काम झालेले आहे. जलपूजनानिमित्त पिंपळगाव कोंझिरा येथील बोगदा व कालव्याच्या दुतर्फा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

पारंपरिक वाद्यांच्या गजरात आमदार बाळासाहेब थोरात यांची कार्यक्रमस्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. अभंग गायनाने वातावरणात प्रसन्नता आली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com