Dimbhe dam Agrowon
ताज्या बातम्या

Dimbhe Dam : रब्बीसाठी डिंभे धरणातून उजव्या कालव्याला पाणी

८०० क्युसेकने विसर्ग; आंबेगाव, शिरूरला फायदा

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : रब्बी हंगामासाठी डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू) (Dimbhe Dam) जलाशयातून पाणी नुकतेच सोडण्यात आले आहे. डाव्या व उजव्या अशा दोन्ही कालव्यास धरणातून ८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे याचा फायदा आंबेगाव, शिरूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

धरणांतील पाण्याची उपयुक्त पाण्याची क्षमता १२.४९ टीएमसी एवढी आहे. पावसाळ्यात पश्‍चिम भागात झालेल्या पावसामुळे धरणे भरून वाहिली. सध्या धरणांत ११.५९ टीएमसी म्हणजेच सरासरी ९२.७९ टक्के पाणीसाठा आहे. परंतु रब्बी हंगाम सुरू असल्याने आंबेगाव, शिरूर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी धरणांतून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार पाटबंधारे विभागाकडून नुकतेच पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना ‘टेल टू हेड’ या पद्धतीने पाण्याचे वितरण करण्यात येईल.

आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणापासूनचा पूर्व भाग आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हरभरा, गहू, ज्वारी, सूर्यफूल, मका, फळबागा घेतल्या आहेत. याशिवाय कांदा, बटाटे, भाजीपाला याचे उत्पादन घेतले जाते. सोडलेल्या पाण्याचा कालावधी निश्‍चित नसल्याने शेतकरी वर्ग संभ्रमात असून मे महिन्यापर्यंत पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT