Dimbhe Dam : डिंभे धरणाचे जलपूजन

शंभर टक्के भरल्याने शेतकरी आनंदी
Dimbhe Dam
Dimbhe DamAgrowon

फुलवडे, ता. आंबेगाव ः कुकडी प्रकल्पातील प्रमुख समजले जाणारे हुतात्मा बाबू गेनू जलाशय(Hutatma Babu Genu Jalashay) (डिंभे धरण) १०० टक्के भरल्याने त्याची पाहणी आणि जलपूजन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांच्या हस्ते करण्यात आली.

Dimbhe Dam
Dam Filled : धरणांतील विसर्गात घट जिल्ह्यात पाऊस ओसरला; २१ धरणे शंभर टक्के भरली

डिंभे धरणाची क्षमता १२.५०० टीएमसी असून या पाण्याचा लाभ पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांतील आंबेगाव, जुन्नर, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा व करमाळा या तालुक्यांतील ४६ गावांतील शेतकऱ्यांना मिळतो. या पाण्यामुळे १४ हजार १२९.२५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते.

Dimbhe Dam
Dam Intake : धरणांत ५२६ टीएमसी पाण्याची आवक

सध्या धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने या भागातील शेतकरी आनंदी असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. या प्रसंगी कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, माजी सभापती संजय गवारी, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी उपसभापती नंदकुमार सोनावले, शरद बँकेचे संचालक प्रदीप आमुंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com