Water Crisis  Agrowon
ताज्या बातम्या

Water Crisis : जळगावमध्ये ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Water Shortage : राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले असले, तरी जळगाव जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने नद्या, नाल्यांना पूर आलेला नाही.

Team Agrowon

Jalgaon News : राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले असले, तरी जळगाव जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने नद्या, नाल्यांना पूर आलेला नाही. परिणामी, जिल्ह्यातील पाणीटंचाई अद्याप मिटलेली नाही. ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीटंचाई निवारणासाठी ७७ गावांमध्ये ८२ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

जूनमध्ये केवळ ३६.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत ८४.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यंदा निम्मे पर्जन्यमान घटल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस न झाल्याने पाणीटंचाईच्या उपाययोजना सुरूच आहेत. जुलै सुरू झाला, तरीही समाधानकारक पाऊस नसल्याने ३१ गावांत ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

राज्यात सर्वत्र पावसाचे दमदार आगमन झाले. गेल्या गुरुवार (ता. ६)पासून शहरासह जिल्ह्यात काही प्रमाणात पाऊस होत आहे. त्यावर शेतकऱ्यांनी ५४ टक्के पेरण्या केल्या. शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४४.८ टक्के पाऊस झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

गिरणा धरणात १९.२८ टक्के साठा असून, हतनूर ३८.८२ टक्के, वाघूर ५६.४१, सुकी १००.०, अभोरा १००, मंगरूळ १००, मोर ६८.७८, अग्नावती ००, हिवरा ४.४६, बहुळा १४.७७, तोंडापूर ३१.८९, अंजनी १२.९०, गूळ ६३.३८, भोकरबारी ००, बोरी ०० आणि मन्याड धरणात ६.५५ टक्के साठा शिल्लक आहे.

दमदार पावसाची प्रतीक्षा
पावसाचा हवामान अंदाज बघता हवामान खाते व कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी घाई नको, असा सल्ला दिला होता. मात्र जून महिना संपून जुलैमध्येही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

त्यात खरीप हंगामातील उशिरा पेरण्यांमुळे पुढील येणाऱ्या रब्बी हंगामाचे गणित बिघडणार आहे. शेतकऱ्यांनी वरुणराजाच्या भरवशावर अल्प पावसाच्या आधारे कपाशी लागवड व पेरण्या उरकल्या आहेत. मात्र सध्या दमदार पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT