Radhanagari Dam Agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Rain : कोल्हापुरात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ कायम

Kolhapur Dam Water : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर रविवारी (ता. ९) सकाळपर्यंत कायम राहिला. राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वीस फुटांनी वाढ झाली आहे.

Team Agrowon

Kolhapur Monsoon News : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर रविवारी (ता. ९) सकाळपर्यंत कायम राहिला. राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वीस फुटांनी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत धरणक्षेत्रात ८८ मिमी तर दाजीपुरात १२४ मिमी पाऊस झाला. आठवडाभरातील पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वीस फुटांनी वाढ झाली आहे.

पाऊस सुरू होण्यापूर्वी पाणी पातळी २८७ फूट होती. ती शनिवारी (ता. ८) सायंकाळपर्यंत ३६० फुटांवर पोहोचली आहे. काळम्मावाडी धरणाच्या पाणीसाठ्यात पावणेदोन टीएमसीने वाढ झाली आहे. या धरण क्षेत्रात २४ तासांत ६७ मिमी तर तुळशीत ५१ मिमी पावसाची नोंद झाली.

तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. २४ तासात २९ मिमी पावसाची नोंद झाली. केळोशी बुद्रुक येथील लोंढा नाला प्रकल्प ३५ टक्के भरला आहे. दरम्यान, तुळशी धरणातून सोडण्यात आलेला नदीपात्रातील विसर्ग बंद करण्यात आला आहे.

रविवार दुपारपासून राधानगरी धरणातून वीजनिर्मितीसाठी ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. संततधार पावसाने पाणीसाठ्यात होणारी वाढ नियंत्रित राखण्यासाठी बीओटी तत्त्वावरील वीज केंद्रातून वीजनिर्मिती सुरू झाली आहे.

मात्र धरण पायथ्याशी असलेल्या आणि बंद केलेल्या जुन्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून वीज निर्मितीला ‘महाजेनको’कडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. यंदाच्या पावसाळ्यात या केंद्रातून पूर्ववत वीजनिर्मिती सुरू करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वीच जनित्र संचाची विशेष देखभाल दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT