Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Water Storage : प्रकल्पांतील जलसाठा पोहोचला ८५ टक्क्यांवर

Latest Rain Update : आता पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने सध्या प्रकल्पांतील जलसाठा ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. सातपैकी पाच मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. ६५ लघुप्रकल्पांतील जलसाठा वाढला आहे.

Team Agrowon

Yavatmal News : पावसाने खंड दिल्याने प्रकल्पांतील जलसाठा कमी होत होता. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली होती. आता पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने सध्या प्रकल्पांतील जलसाठा ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. सातपैकी पाच मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. ६५ लघुप्रकल्पांतील जलसाठा वाढला आहे.

ऑगस्टमध्ये पावसाने उसंत घेतल्याने नागरिकांची चिंता वाढली होती. पावसाची टक्केवारी कमी झाल्याने प्रकल्पांतील जलसाठ्यात घट दिसत होती. पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात टंचाईचे चटके बसण्याची भीती नागरिकांना होती. मात्र, सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने प्रकल्पांतील जलसाठा वाढला.

जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु अशा सर्वच प्रकल्पांतील साठा वाढला आहे. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. प्रकल्पांतील कमी झालेला जलसाठा वाढला आहे. तीन मोठ्या प्रकल्पांत सध्यःस्थितीत ७८.२२ टक्के जलसाठा आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी गोकी, वाघाडी, साखखेडा, बोरगाव व नवरगाव हे पाच प्रकल्प शंभरटक्के भरले आहेत. अडाण प्रकल्पात ९५ टक्के जलसाठा आहे. लोअर पूस प्रकल्पातील साठा ८९.३३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

अजून पावसाचे दिवस शिल्लक आहेत. ऑक्टोबरमध्ये पावसाची शक्यता असल्याने प्रकल्पांतील जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक लघुप्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्यामुळे गावशिवारातील पाणीटंचाईचे संकट कमी झाले आहे. मोठे प्रकल्पही ९० टक्क्यांवर भरले आहेत.

बेंबळामधील जलसाठा ५७.३० टक्क्यांवर पोहोचला आहे. हा जलसाठा गेल्या काही दिवसांत वाढला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. प्रकल्पांतील जलसाठा वाढल्याने उन्हाळ्यातील चिंता कमी झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु अशा ७५ प्रकल्पांत सद्यःस्थितीत ८४.७० टक्के जलसाठा आहे.

प्रकल्पनिहाय टक्केवारी

पूस ९६.६६

अरुणावती ९०.९८

बेंबळा ५७.३०

गोकी १००

वाघाडी १००

सायखेडा १००

लोअरपूस ८९.३३

बोरगाव १००

अडाण ९४.५१

नवरगाव १००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT