Water Shortage  Agrowon
ताज्या बातम्या

Water Shortage : पुणेकरांनो पाणी जपून वापरा, १८ धरणांनी गाठला तळ

Dam Water Level Pune : राज्यात मॉन्सूनचे अद्यापही आगमन न झाल्याने चिंतेचा विषय बनला आहे. राज्यातील अनेक धरणांनी तळ गाठल्याने पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यात मॉन्सूनचे अद्यापही आगमन न झाल्याने चिंतेचा विषय बनला आहे. राज्यातील अनेक धरणांनी तळ गाठल्याने पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यात शेतीसाठी उपसाबंदी सुरू झाल्याने शेती पिकांचे नुकसान होत आहे.

दरम्यान आता पुणे जिल्ह्यातही पाणी टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह जिल्ह्याला शेती आणि पिण्यासाठी पाणी देण्याऱ्या १८ धरणांनी तळ गाठला आहे. यामुळे पुढच्या काही दिवसांत पाऊस नाही झाला तर परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात एकूण पाच प्रमुख नद्या आहेत यामध्ये २५ धरणांमधून पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा केला जातो. दरम्यान अद्याप मान्सूनने आगमन न केल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. यातील अनेक धरणांनी तळ गाठल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

मागच्या वर्षी झालेल्या पावसाने अनेक धरणे १०० टक्के भरली होती परंतु यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात पाऊस न झाल्याने पाण्याची वाढती मागणी, बाष्पीभवन, पाण्याची चोरी आणि गळती अशा विविध कारणांमुळे धरणांचा पाणीसाठा कमी झाला.

पुण्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, घोड, विसापूर, चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, वडीवळे, कासारसाई, मुळशी, टेमघर, खडकवासला, गुंजवणी, निरा देवघर, नाझरे आणि उजनी या धरणांनी तळ गाठला आहे.

उजनी धरणाने तर तळ गाठून उणे १५.०३ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा खालावला आहे. याचबरोबर मागच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने १९ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हजेरी लावल्याने काही प्रमाणात साठा शिल्लक आहे.

दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांत मिळून एकूण ४.८२ टीएमसी म्हणजे १६.५० टक्के पाणीसाठी शिल्लक आहे.

तसेच टेमघर धरणाची दुरुस्ती सुरू असल्याने या धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यात आले आहे. तसेच पानशेत आणि खडकवासला या धरणांत अनुक्रमे १.३५ टीएमसी आणि ०.९१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे.

पुण्यातील धरणांची स्थिती

डिंभे १.०२ (८.१६), चासकमान ०.६१ (८.००), भामा आसखेड १.९७ (२५.७०), पवना १.७२ (२.१६), टेमघर ०.१३ (३.४३), वरसगाव २.४३ (१८.९५), पानशेत १.३५ (१२.६५), खडकवासला ०.९१ (४६.३२), गुंजवणी ०.६२ (१६.८०), निरा देवघर ०.२१ (१.७९), भाटघर १.३९(५.९१), वीर १.७७ (१८.८६) उजनी १५.२० (२८.३७) अशी स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT